भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याची तब्बल 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी उमेश यादव याने नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. उमेशच्या जुन्या मॅनेजरनेच त्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शैलेश ठाकरे असे फसवणूक करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. शैलेश ठाकरे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे. नागपूर पोलिसांनी याबाबत माहीती दिली आहे
डीसीपी अश्विनी पाटील यांनी सांगितले की, “शैलेश ठाकरे नावाच्या व्यक्तीने उमेश यादव यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी ४४ लाख रुपये घेऊन क्रिकेटपटूची फसवणूक केली. आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत शैलेश ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वी उमेशचे उत्पन्न, बँक तपशील आणि इतर सर्व माहीती शैलेशकडेच होत्या. शैलेशने त्याच्याकडून पैसे घेऊन कोणतेही काम केले नाही, असे उमेशचे म्हणणे आहे. उमेशला मालमत्ता खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ४४ लाख रुपये जमा केले होते. शैलेशने हे सर्व पैसे काढून स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा शैलेश पळून गेला.
उमेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात आहे
उमेश यादवचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. उमेशने आतापर्यंत 54 कसोटीत 165 आणि 75 एकदिवसीय सामन्यात 106 बळी घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.