Asian Games Football : सहभागाबाबत भारतीय फुटबॉल महासंघ आशावादी; सुनील छेत्रीकडे नेतृत्व!

Indian Football Team led by Sunil Chhetri set for Asian Games
Indian Football Team led by Sunil Chhetri set for Asian Games
Updated on

Indian Football Team led by Sunil Chhetri set for Asian Games : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखाली प्रमुख फुटबॉल संघ पाठविण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आशावादी आहे. महासंघाला आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेला हँगझोऊ येथे २३ सप्टेंबरला सुरवात होईल. जाकार्ता येथे २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला सहभागासाठी संमती मिळाली नव्हती. भारतीय फुटबॉल संघ सध्या आशियात १८व्या क्रमांकावर आहे.

Indian Football Team led by Sunil Chhetri set for Asian Games
India Wrestling Squad Asian Games: आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार पहिल्या आठ क्रमांकावरील संघांनाच पाठविले जाते. क्रोएशियन मार्गदर्शक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने फिफाच्या जागतिक मानांकनात पहिल्या १०० संघांत स्थान मिळविले आहे. त्यांनी हल्लीच लेबनॉन, कुवेत या संघांना नमवून सॅफ फुटबॉल स्पर्धाही जिंकली होती.

Indian Football Team led by Sunil Chhetri set for Asian Games
WI vs IND: ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा! दोन दिग्गज खेळाडूचा पत्ता कट, यांना मिळाली संधी

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार फुटबॉल संघात २३ वर्षांपेक्षा जास्त वयाचे तीन खेळाडू खेळविता येतात. भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय संघात २३ वर्षांखालील सात खेळाडू आहेत. त्यामुळे कर्णधार सुनील छेत्री, गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू, बचावपटू संदेश झिंगन हे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहेत, फक्त संघाला मंजुरीची प्रतीक्षा आहे, असे सूत्राने सांगितले.

एआयएफएफने २३ वर्षांखालील वयोगटातील ५० खेळाडूंची यादी तयार केली आहे. या वयोगटात खेळाडूंचा चांगला संच तयार व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. या खेळाडूंचा उपयोग एएफसी २३ वर्षांखालील आशियाई करंडक पात्रता फेरी, थायलंडमधील किंग्स कप आदी स्पर्धा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.