Indian Football Team News: फिफा वर्ल्डकप 2026 आणि एएफसी एशिनय कप 2027 या स्पर्धांसाठी प्राथमिक संयुक्त पात्रता स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघ सौदी अरेबियाला 15 मार्च रोजी रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारताला अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ 21 मार्च रोजी आभा, सौदी अरेबियाविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 22 मार्चला रात्री 12.30 वाजता चालू होईल.
दरम्यान, अफगाणिस्ताविरुद्ध याच लेगमधील भारताचा मायदेशातील सामना 26 मार्च रोजी होईल. हा सामना गुवाहाटीतील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर होणार आहे.
सध्या फिफा वर्ल्डकप 2026 आशियाई पात्रता स्पर्धेत भारतीय संघ अ गटात असून या गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे आणि कुवेतचे प्रत्येकी 3 पाँइंट्स आहेत. परंतु, कुवेत गोलफरकाने भारताच्या पुढे आहे. तसेच कतार या गटात 6 पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. अखेरच्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे.
या स्पर्धेत भारताने कुवेतविरुद्ध त्यांच्याच देशात 1-0 ने विजय मिळवण्याची करामत केली होती. मात्र नंतर कतारविरुद्ध भारताला भुवनेश्वरला झालेल्या सामन्यात 0-3 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान आता भारतीय संघाला एशियन कप 2023 मधील अपयश विसरून अफगाणिस्तानविरुद्ध चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. भारतीय संघाचा आता तिसऱ्या फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.
गोलकिपर - गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, विशाल कैथ
डिफेंडर्स - आकाश मिश्रा, मेहताब सिंग, राहुल भेके, निखिल पुजारी,सुभाशिष बोस, अन्वर अली, अमेय रनावडे, जय गुप्ता.
मिडफिल्डर - अनिरुद्ध थापा, ब्रेंडन फर्नांडिस, लिस्टन कोलास, महेश सिंग नाओरेम, सहल अब्दुल सामद, सुरेश सिंग वँगजम, जिक्सन सिंग थौनौजाम, दीपक तंग्री, लालेंगमाविया राल्टे, इम्रान खान
फॉरवर्ड्स - सुनील छेत्री, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.