Anwar Ali Ban: भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अन्वर अली याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चार महिन्यांची बंदी घातली आहे. मोहन बगानसह असलेला करार अवैधपणे रद्द केल्यामुळे अन्वर अलीवर ही कारवाई करण्यात आली.
बंदीसह त्याच्यावर १२.९० कोटी रुपयांची भरपाई मोहन बगानला देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मोहन बगानशी असलेला करार रद्द करून अन्वर अलीने दिल्ली एफसी आणि ईस्ट बंगाल यांच्याशी करार केला होता. या क्लबवरही फुटबॉल महासंघाच्या खेळाडू स्टेटस समितीने कारवाई केली.