Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Indian Junior Men’s Hockey Team: सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडकासाठी भारतीय ज्युनियर संघाची घोषणा झाली आहे.
Indian Junior Men’s Hockey Team
Indian Junior Men’s Hockey TeamSakal
Updated on

Sultan of Johor Cup 2024: मलेशिया येथे १९ ऑक्टोबरपासून खेळवण्यात येत असलेल्या सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडकासाठी भारतीय ज्युनियर संघाची घोषणा करण्यात आली. हॉकी इंडिया यांच्या वतीने निवडण्यात आलेल्या भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीर अली याच्याकडे सोपवण्यात आले आहे, तसेच या संघाचे उपकर्णधारपद रोहित याच्या खांद्यावर असणार आहे.

सुल्तान जोहोर हॉकी करंडक १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत मलेशिया येथे खेळवण्यात येणार आहे. या करंडकासाठी अमीर अली व गुरज्योत सिंग या दोन हॉकीपटूंची निवड भारताच्या ज्युनियर संघामध्ये करण्यात आली आहे.

Indian Junior Men’s Hockey Team
India Hockey Team: मेजर ध्यान चंद यांना त्रिवार अभिवादन! भारतीय हॉकीपटूच्या कृतीला सलाम

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडकात या दोनही खेळाडूंनी भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेचे जेतेपद राखताना उल्लेखनीय कामगिरी केली.

अमीर अली व गुरज्योत सिंग या दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये छान कामगिरी केली होती. त्यामुळे सुल्तान जोहोर हॉकी करंडकामध्ये या दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

भारतीय ज्युनियर हॉकी संघाचा कर्णधार अमीर अली याप्रसंगी म्हणाला, सुल्तान जोहोर करंडक ही नेहमीच प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. मलेशिया येथे होणार असलेल्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हॉकीपटू उत्सुक आहेत.

Indian Junior Men’s Hockey Team
India vs Korea Hockey Live : चक दे इंडिया! भारताची फायनलमध्ये धडक; जेतेपदासाठी चीनला देणार टक्कर

भारतीय हॉकी संघाच्या लढती

  • १९ ऑक्टोबर - जपान

  • २० ऑक्टोबर - ग्रेट ब्रिटन

  • २२ ऑक्टोबर - मलेशिया

  • २३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया

  • २५ ऑक्टोबर - न्यूझीलंड

भारतीय संघ -

  • गोलकीपर - बिक्रमजीत सिंग, अली खान

  • डिफेंडर - आमिर अली (कर्णधार), तालिम प्रियोवार्ता, शारदानंद तिवारी, सुखविंदर, अनमोल एक्का, रोहित (उपकर्णधार)

  • मिडफिल्डर - अंकित पाल, मनमीत सिंग, रोसन कुजूर, मुकेश टोप्पो, चंदन यादव

  • फॉरवर्ड - गुरजोत सिंग, सौरभ आनंद कुशवाह, दिलराज सिंग, अर्शदीप सिंग, मोहम्मद कोनैन दाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.