ISSF World Championship : भारताच्या नेमबाजांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाला जिंकून दिलं पहिलं पदक

ISSF World Championship
ISSF World Championshipesakal
Updated on

ISSF World Championship : भारताच्या पुरूष संघाने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकून दिले. शिवा नरवाल, सरबजीत सिंग, अर्जुन सिंह चीमा यांच्या संघाने अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.

ISSF World Championship
Neymar Al-Hilal : काय त्या गाड्या.. काय तो राजवाडा.. नेमारवर अल - हिलालनं केला मोठा खर्च

भारतीय संघातील सर्व नेमबाजांनी एकूण 1734 गुण मिळवले. रौप्य पदक विजेत्या जर्मनीपेक्षा भारताचे फक्त 9 गुणच कमी राहिले. 10 मीटर एअर पिस्तूल पुरूष सांघिक प्रकारात चीनने सुवर्ण पदक जिंकले. भारताकडून नरवालने 579, सरबजोतने 578 आणि चीमाने 577 गुण मिळवले.

चीनच्या संघातील झांग बोवेन (587), लियू (582) आणि यू (580) यांनी एकूण 1749 गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले. जर्मन संघाकडून रॉबिन वॉल्टर (586), मायकेल श्वाल्ड (581) आणि पॉल फ्रोहलिच (576) यांनी एकूण 1743 गुण मिळवत रौप्य पदक पटकावले.

ISSF World Championship
Ghoomar : दिग्गज हर्षा भोगले, अजिंक्य रहाणेने घूमर चित्रपटावर केला कौतुकाचा वर्षाव

भारताने सांघिक प्रकारात जरी पदक जिंकले असले तरी भारतीय संघातील एकाही नेमबाजाला पहिल्या 8 खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांना वैयक्तिक पदकासाठीच्या फायनल राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()