Asian Games 2023 : भारताच्या पुरूष आणि महिला बद्धीबळ संघाने एशियन गेम्स 2023 मध्ये रौप्य पदक पटकावले. याचबरोबर भारताची एशियन गेम्समधील यंदाची ऐतिहासिक मोहीम ही 107 पदकांसह संपली.
सुवर्ण - 28
रौप्य - 34
कांस्य - 41
अंतिम फेरीत भारताच्या हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, वनिता अगरवाल आणि सविता श्री भास्कर यांनी आपपाले सामने जिंकून दक्षिण कोरियाचा पराभव 4 -0 असा केला होता.
फायनलमध्ये त्यांनी 15 मॅचपाईंट्स मिळवले. मात्र रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या चीनने युएईविरूद्धची आपली अंतिम फेरी जिंकून 18 पैकी 17 मॅच पॉईंट्स खिशात टाकले. याचबरोबर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले.
यानंतर भारतीय पुरूष बुद्धीबळ संघाने फिलिपिन्सविरूद्ध 3.5 - 0.5 असा विजय मिळवला. टॉप सिडेड अर्जुन, डी गुकेश, विदित गुजराथी आणि हरिकृष्ण पेनताला यांनी त्यांचे सामने जिंकले. तर आर प्रग्यानंदाने इराणच्या बुद्धीबळपटूविरूद्ध आपला सामना ड्रॉ केला. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर इराणने सुवर्ण पदकाची कमाई केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.