India vs Vietnam football match: भारतीय पुरुष फुटबॉल संघ १२ ऑक्टोबर रोजी व्हिएतनामविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. या सामन्याचे गुण फिफा क्रमवारीत मोजले जाणार आहेत. देशातील अस्थीरतेमुळे या त्रि-देशीय स्पर्धेतून लेबनॉनने माघार घेतली आहे.
वेळापत्रकानुसार, भारताचा सामना ९ ऑक्टोबरला व्हिएतनाम आणि १२ ऑक्टोबरला लेबनॉनविरुद्ध होणार होता. परंतु स्पर्धेतून लेबनॉनने माघार घेतल्यानंतर, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने व्हिएतनाम फुटबॉल फेडरेशनला सामना १२ ऑक्टोबरला घेण्याची विनंती केली. जी व्हिएतनाम फुटबॉल फेडरेशनकडून मान्य करण्यात आली.
भारतीय संघ ५ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे एकत्र येईल आणि ६ ऑक्टोबर रोजी त्यांचे प्रशिक्षण सत्र असेल. ७ ऑक्टोबरला रोजी प्रशिक्षक मॅनोलो मार्क्वेझ यांच्यासह भारतीय संघ व्हिएतनामसाठी रवाना होईल.
२० जुलै २०२४ रोजी इगोर स्टिमॅक यांच्या निवृत्तीनंतर नवनियुक्त झालेल्या मॅनोलो मार्क्वेझ यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ ही दुसरी स्पर्धा खेळणार आहे. याआधी इंटरकॉन्टिनेंटल चषक ही स्पर्धा भारताने ५६ वर्षीय मार्क्वेझ यांच्या प्रशिक्षणाखाली खेळली होती. नियुक्तीनंतर त्याची ही पहिलीच स्पर्धा होती.
मार्क्वेझ यांनी सोमवारी २६ संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली. तर व्हिएतनाम दौऱ्यापूर्वी २३ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले.
गोलरक्षक : गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, प्रभसुखान सिंग गिल.
बचावपटू : निखिल पुजारी, राहुल भेके, चिंगलेनसाना सिंग कोनशाम, रोशन सिंग नौरेम, अन्वर अली, जय गुप्ता, आशिष राय, सुभाषीष बोस, मेहताब सिंग.
मिडफिल्डर: सुरेश सिंग वांगजाम, जेक्सन सिंग, नंदकुमार सेकर, नौरेम महेश सिंग, यासिर मोहम्मद, लालेंगमाविया राल्टे, अनिरुद्ध थापा, सहल अब्दुल समद, लल्लियांझुआला छांगटे, लालथांगा खवलह्रिंग.
फॉरवर्ड्स: कियान नासिरी गिरी, एडमंड लालरिंदिका, मनवीर सिंग, लिस्टन कोलाको.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.