Arshdeep Singh : 'अर्शदीप पाजी जास्त लोड घेऊ नको' गद्दार कमेंटनंतर रिचा चढ्ढाची प्रतिक्रिया

Arshdeep Singh  Richa Chadha
Arshdeep Singh Richa Chadhaesakal
Updated on

Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने महत्वाच्या क्षणी एक झेल सोडला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. दरम्यान, अर्शदीप सिंग संघाच्या बसमध्ये चढताना एका व्यक्तीने त्याला गद्दार असे संबोधले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्शदीपला गद्दार ठरवणाऱ्यांवर अनेक जणांनी टीका केली आहे. आता अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील यावर टीका केली आहे. (Arshdeep Singh Called Traitor Actress Richa Chadha Angry)

Arshdeep Singh  Richa Chadha
Video : भारताच्या पराभवानंतर अर्शदीपला चाहत्याने म्हटले 'देशद्रोही', त्यानंतर झाले ते...

अर्शदीपने 18 व्या षटकात पाकिस्तानच्या आसिफ अलीचा कॅच सोडला होता. जर हा कॅच अर्शदीपने पकडला असता तर सामन्याचे चित्र वेगळेच असते. अर्शदीपने कॅच सोडल्यानंतर त्याच्यावर पातळी सोडून टीका झाली. एका व्यक्तीने तर तो संघाच्या बसमध्ये चढत असतानाच त्याला गद्दार असे संबोधले. या व्हिडिओवर अभिनेत्री रिचाने देखील आपली प्रतिक्रिया दिली. तिने अर्शदीपचे समर्थन करताना ट्विट केले की, 'घाणेरडा, ज्याला गोगल गाय देखील हरवू शकेल असा उद्धट व्यक्ती खेळाडूविषयी वाईट बोलतोय. तुझं आयुष्य *** आहे. दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देऊ नको. अर्शदीप पाजी तू जास्त लोड घेऊ नको लव्ह यू.'

Arshdeep Singh  Richa Chadha
Asia Cup : ऋषभ तू धोनीसारखा चलाख कधी होणार? नेटकऱ्यांनी झापलं

अर्शदीपला गद्दार म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता आयुषमान खुराणा आणि स्वरा भास्कर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. आयुषमान म्हणाला होता की, 'आपण हरलो असलो तरी आपल्या संघाला सपोर्ट केला पाहिजे. आणि कृपा करून अर्धदीपला ट्रोल करणं बंद करा. तो एक चांगला क्षमता असलेला खेळाडू आहे.'

तर स्वरा भास्कर म्हणाली होती की, 'अर्शदीप आम्हाला तुझ्यावर गर्व आहे आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. कणखर रहा.' स्वरा भास्कर सोबतच गुल पनाह, पूजा भट्ट यांनी देखील अर्शदीपच्या समर्थनात ट्विट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.