Devendra Jhajharia: देवेंद्र झाझरिया पॅरालिम्पिक समिती नवे अध्यक्ष; भाजपकडून नुकतंच मिळालंय लोकसभेचं तिकीट

President of Paralympic Committee of India: देवेंद्र झाझरिया यांनी जवळपास २२ वर्ष पॅरा अॅथलेट्स म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
Devendra Jhajharia
Devendra Jhajharia
Updated on

नवी दिल्ली- भारतीय पॅरालिप्किक समितीचे नवे अध्यक्ष म्हणून देवेंद्र झाझरिया यांची निवड झाली आहे. नुकतेच भाजपकडून त्यांना लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे. आज पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झालीये. त्यांच्या नावाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Devendra Jhajharia appointed as President of Paralympic Committee of India)

देवेंद्र झाझरिया यांनी जवळपास २२ वर्ष पॅरा अॅथलेट्स म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपूर्वी झाझरिया यांनी खेळातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी जेव्हा पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हाच त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती. कारण, त्यांच्याशिवाय इतर कोणाही व्यक्तीने यासाठी अर्ज केला नव्हता. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.

Devendra Jhajharia
Lok Sabha elections 2024 : कोण आहे पॅरा अ‍ॅथलिट देवेंद्र झाझरिया? ज्याला भाजपनी दिली खासदारकीची उमेदवारी

भारत सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मान

देवेंद्र झाझरिया यांच्या नावे अनेक पुरस्कार आहेत. त्यांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला दोन वेळेस सुवर्ण पदक जिंकून दिले आहेत. याशिवाय त्यांनी एकवेळा रौप्य पदक देखील नावावर केलं आहे. त्यांनी खेळात दाखवलेल्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. याशिवाय मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन अवॉर्डही त्यांच्या नावावर आहे.

Devendra Jhajharia
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

राजकारणाच्या रिंगणात

देवेंद्र झाझरिया यांनी भाजपसोबत राजकीय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. त्यांना राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. देवेंद्र यांचा जन्म राजस्थानमधील चुरुच्या सादूलपूरमध्ये १० जून १९८१ मध्ये सर्वसाधारण शेतकरी घरात झालाय. सुरुवातीपासूनच त्यांचा खेळामध्ये रस होता. ते लाकडाचा भाला म्हणून वापर करायचे. १९९५ मध्ये त्यांनी शाळेत असताना भालाफेक स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी भालाफेकमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.