आयपीएल 2022 (Indian Premier League 2022) चा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलमधील 10 संघ मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या साखळी सामन्यांसाठी जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आयपीएलमध्ये परतणार असल्याची माहिती मिळत आहे. डिव्हिलियर्सने गेल्या हंगामानंतर आयपीएल बरोबरच सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
एबी डिव्हिलियर्स गेल्या अनेक वर्षापासून आरसीबीचा एक महत्वाचा फलंदाज होता. गेल्या हंगामातच त्याने सर्व क्रिकेट (Cricket) प्रकारातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो आता येत्या हंगामात आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता नव्हती. मात्र आता आरसीबी (RCB) आपल्या या 360 प्लेअरला आयपीएलच्या 15 व्या हंगामात परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. आरसीबी याबाबतची घोषणा काही दिवसातच करण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोरमध्ये डिव्हिलियर्सला एक नवी भुमिका मिळण्याची शक्यता आहे.
डिव्हिलियर्स आता आरसीबीच्या मेंटॉरच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा आरसीबी लवकरच करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्स यांचा याराना तसा फार जुना आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचे आरसीबीचा कर्णधार म्हणून पुन्हा ताजपोशी होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा एबी विराट जोडी आरसीबीच्या गोटात दिसले.
एबी डिव्हिलियर्सने 2008 मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. तो 2010 पर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत होता. त्यानंतर तो 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडे आला. त्यानंतर तो जवळपास दशकभर म्हणजे 2021 पर्यंत आरसीबीकडूनच खेळत राहिला. डिव्हिलियर्स आयपीएलचा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 184 सामन्यातील 170 डावात 5162 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 40 अर्धशतकांचा सामावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने 133 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.