Paralympic 2024: नितेशने पॅरिसमध्ये फडकवला तिरंगा! IIT पदवीधर आता सुवर्णपदक विजेता

Nitesh Kumar Won Gold Medal: भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
Nitesh Kumar | Paris Paralympic
Nitesh Kumar | Paris ParalympicSakal
Updated on

India Badminton Players at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. सोमवारी भारताच्या नितेश कुमारने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

हे भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील नववे पदक आहे, तर दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नेमबाज अवनी लेखराने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.

नितेशचा सुवर्णपदकासाठी अंतिम सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध झाला. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात नितेशने १ तास २० मिनिटाच्या लढतीनंतर २१-१४, १८-२१, २३-२१ अशा फरकाने विजय मिळवला.

या सामन्यात पहिला गेम सुरुवातीला रोमांचक झाला होता. दोन्ही खेळाडू एकमेंकांना तगडे आव्हान देत होते. पण पहिल्या गेमच्या मध्यानंतर नितेशने दमदार खेळ केला आणि हा गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही पहिल्या गेमप्रमाणेच चित्र दिसले. नितेशने आघाडी घेतली होती. पण नंतर बेथेलने पुनरागमन करत बरोबरी साधली. त्याने दुसरा गेम जिंकला आणि सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटपर्यंत नेला.

तिसरा गेम अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडू हार मानण्यास तयार नव्हते. एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते २१-२१ अशी बरोबरीही झालेली. पण अखेरीस दोन पाँइंट्स जिंकत नितेशने सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयानंतर नितेशने जोरदार जल्लोषही केला.

Nitesh Kumar | Paris Paralympic
Paris Paralympic 2024: भारतासाठी आनंद अन् निराशाही! यथिराज आपल्याच देशाच्या सुकांत कदमला पराभूत करत सुवर्णपदकासाठी खेळणार

IIT पदवीधर नितेश

२९ वर्षीय नितेशने आयआयटी मंदीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. नितेश याचा २००९ मध्ये अपघात झाला होता, ज्यामुळे त्याचा पायाला दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीमुळे कायमस्वरुपी पायात अपंगत्व आले. पण यानंतरही नितेशने त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि त्याने २०१३ मध्ये आयआयटी मंदी येथे प्रवेश मिळवला.

तिथे शिक्षण घेत असतानाच त्याच्यामध्ये बॅडमिंटनबद्दल रस निर्माण झाला. २०१६ मध्ये त्याची निवड पॅरा नॅशनल चॅम्पियनशीपसाठी हरियाणा संघातही झाली.

२०१७ मध्ये त्याने पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले. त्याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही त्याने २०१८ आणि २०२२ मध्ये दुहेरीत पदके जिंकली आहेत. तो हरियाणामध्ये क्रीडा विभागात बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणूनही काम पाहातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.