T20 World Cup 2022 India Squad : संघ जाहीर! जडेजा वर्ल्डकपला मुकला; बुमराह, पटेल परतले

T20 World Cup 2022 India Squad
T20 World Cup 2022 India Squadesakal
Updated on

T20 World Cup 2022 India Squad : येत्या 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या ICC T20 World Cup 2022 साठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली. संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांनी पुनरागमन केले आहे. तर जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप झाल्यानंतरच संघ जवळपास 95 टक्के निश्चित झाला असल्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे आशिया कपमध्ये खेळलेल्या संघात फारसा बदल नाही. भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

T20 World Cup 2022 India Squad
David Warner : पुन्हा वॉर्नरच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ?

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

T20 World Cup 2022 India Squad
Sikandar Raza : झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकले मागे

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघाबरोबरच मायदेशात येत्या 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी देखील संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (India Squad for Australia T20Is) :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

T20 World Cup 2022 India Squad
Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीला रणजीपटूने केले प्रपोज

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

बीसीसीआयची नोट :

भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार हे फिटनेस ट्रेनिंगसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.