T20: 'टीम इंडिया'च्या उपकर्णधार पदासाठी 'ही' ३ नावे चर्चेत

Team-India
Team-India
Updated on
Summary

यादीतील तिसरं नाव वाचून कदाचित तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

टीम इंडिया चा कर्णधार बदलणार अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. विराट कसोटी कर्णधार असेल तर T20 आणि वन डे मध्ये रोहितकडे कर्णधारपद असेल. या चर्चांना काल पूर्णविराम मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी T20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर तो पदावरून पायउतार होणार आहे. विराट नंतर रोहित शर्मा हाच संघाचा कर्णधार होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता उपकर्णधार कोण असेल याविषयीची चर्चा रंगली आहे. एका क्रिकेट जाणकाराच्या मते, भारतीय T20 संघाच्या उपकर्णधार पदासाठी 3 खेळाडूंची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे.

Team-India
"विराटच्या निर्णयाचा टीम इंडियाला T20 World Cupमध्ये फायदाच"

विराटने आपल्या पत्रात लिहिले होते की, T20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी मी खूप वेळ विचार केला. संघ व्यवस्थापन, रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर अखेर मी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. रोहित हा नेतृत्व फळीत महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्याशी चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. विराटच्या या वाक्यामुळे विराटनंतर रोहितच कर्णधार होणार हे जरी निश्चित असले तरी रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? हा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे. याबाबत बोलताना एका क्रिकेट जाणकाराने तीन नावं सुचवली. कर्णधारपदाचा अनुभव असलेला लोकेश राहुल आणि सध्याचा दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेतच. पण त्याबरोबर जसप्रीत बुमराहचे नावही उपकर्णधार पदासाठी घेतलं जातंय अशी माहिती त्या जाणकाराने दिली.

Team-India
कोहलीने T20 कर्णधार म्हणून केलेले 5 'विराट' विक्रम

ऋषभ पंत सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. रणजी क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने दिल्ली संघाचे नेतृत्व करून त्यांना विजेतेपद मिळवून दिले आहे. विराटच्या अनुपस्थितीत जेव्हा रोहित कर्णधार होता, त्यावेळी लोकेश राहुलने उपकर्णधारपद भुषवले आहेत. तसेच, न्यूझीलंडच्या एका सामन्यात विराट आणि रोहित दोघेही नसताना राहुलने कर्णधारपदही सांभाळले आहे. जसप्रीत बुमराहला नेतृत्वशैलीचा फारसा अनुभव नाही. पण बुमराह BCCIच्या सर्वोच्च करार प्रणालीमध्ये विराट आणि रोहित व्यतिरिक्त एकमेव खेळाडू आहे. तसेच, बुमराह वेगवान गोलंदाजीचा कणा असून तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची संघात हमखास निवड होते. त्यामुळे बुमराहदेखील या पदाचा दावेदार असू शकतो, असे क्रिकेट जाणकाराचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()