Women Boxing Doping : डोपिंगचं जाळं; भारतीय महिला बॉक्सरचं एशियन गेम्स मेडल अन् ऑलिम्पिक कोटाही धोक्यात?

Women Boxing Doping
Women Boxing Dopingesakal
Updated on

Doping Women Boxing : भारतीय महिला हॉकी वर्तुळातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. भारताच्या एका स्टार महिला बॉक्सरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या बॉक्सरने एशियन गेम्समध्ये पदक पटकावलं होतं. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला होता. मात्र डोपिंगमध्ये सापडण्याच्या टांगत्या तलवारीमुळे पदक आणि कोटा दोन्ही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, सध्या तरी या बॉक्सरचे नाव समोर आलेले नाही. मात्र हे नाव लवलिना बोर्गोहेन किंवा निखत झरीनचं देखील असू शकतं. एशियन गेम्समध्ये भारताच्या चार महिला बॉक्सरनी पदके जिंकली होती.

Women Boxing Doping
Shane Bond Rajasthan Royals : MI ला चार ट्रॉफी जिंकून देणारा कोच आता RR च्या गोटात दाखल

भारतीय बॉक्सर डोपिंगच्या जाळ्यात?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय बॉक्सर डोपिंगच्या जाळ्यात नक्कीच अडकली आहे. एशियन गेम्सपूर्वीच्या काळात ही बॉक्सर कुठं होती याचाबाबतची माहिती देण्यात ती अपयशी ठरली आहे. जर डोपिंगमध्ये ती दोषी आढळली तर तित्यावर जास्तीजास्त दोन वर्षाची बंदी येऊ शकते. ही बंदी एका वर्षापर्यंत कमी होऊ शकते.

याचबरोबर तिची या प्रकरणात किती चूक आहे हे पाहिले जाईल. यामुळे एशियन गेम्समधील मेडल आणि पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील गमवू शकते. आयटीएने ऑलिम्पिक काऊन्सील ऑफ एशियाला हांगझू मधील एशियन गेम्सदरम्यान अँटी डोपिंग प्रोग्राममध्ये मदत करण्यासाठी सांगण्यात आले होते.

Women Boxing Doping
Asian Para Games : अवनीचा 'सुवर्ण'वेध; 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात भारताला मिळालं गोल्ड

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागेल अशी आशा आहे. 'नोटिशीमध्ये एशियन गेम्सपूर्वीचा उल्लेख आहे फेडरेशनला याबाबत एशियन्स गेम नंतर माहिती मिळाली. त्या काळात ही बॉक्सर मानसिकदृष्ट्या खचलेली होती. तिच्या कुटुंबातील व्यक्तीला एक गंभीर आजार झाल्याचे समजले होते.

'बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या टीमला याबाबत सुचना दिली आहे. ते या प्रकरणात लक्ष घालत आहेत. जर आम्ही कारण स्पष्ट करू शकलो तर पदक काढून घेणे किंवा ऑलिम्पिक कोटा गमावणे असा कोणताही प्रकार होण्याची शक्यता नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.