इंग्लंड दौऱ्यावर स्मृतीची झोप भुर्रकन उडून जाते!

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिकेसह जवळपास सात वर्षानंतर कसोटी मालिका खेळणार आहे.
Smriti Mandhana
Smriti Mandhanabcci twitter
Updated on

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत भारतीय पुरुष संघासह महिला क्रिकेट संघही इंग्लंडमध्ये पोहचला आहे. भारतीय महिला संघाच्या डावाची सुरुवात करणारी स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) इंग्लंड दौऱ्यावरील सवयीचा किस्सा शेअर केलाय. इंग्लंड असा एकमेव देश आहे ज्या दौऱ्यावर मी लवकर उठते, असे स्मृतीने म्हटले आहे. भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिकेसह जवळपास सात वर्षानंतर कसोटी मालिका खेळणार आहे.

Smriti Mandhana
ENGvsNZ : कॉन्वेनं षटकार खेचत तोऱ्यात साजरं केल द्विशतक!

स्मृती मानधना (Smriti Mandhana) म्हणाली की, मी अधिक झोप घेण्याला पसंती देते. पण इंग्लंडमध्ये आल्यावर माझी ही सवय बदलते. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी अधिक झोप घेत असते. पण इंग्लंड एकमात्र देश आहे ज्या ठिकाणी मी लवकर उठते, असे तिने म्हटले आहे. याठिकाणी मी लवकर झोपते आणि लवकर उठते. इंग्लंड दौऱ्यावर नेहमीच पहाटे साडेपाच ते सहापर्यंत उठते, असा किस्सा स्मृतीने शेअर केलाय. भारतीय महिला संघ पुन्हा नव्याने नियुक्ती केलेल्या रमेश पोवार (Ramesh Powar) यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला पोहचली आहे.खूप दिवसांच्या अंतराने आम्ही एखाद्या मोठ्या दौऱ्यावर आलो आहोत. त्यामुळे आम्ही या दौऱ्यासाठी उत्साहित आहोत, असे स्मृतीने म्हटले आहे.

Smriti Mandhana
जेवढे चेंडू बॅटला लागतील तेवढ्या बाईक देईन; अख्तरचं चॅलेंज

इंग्लंडमध्ये रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधनाला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. कोरोनामुळे महिला क्रिकेटलाही लॉकडाऊनचा तडाखा बसला. यातून सावरत भारतीय महिला संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकन महिलांविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेच्या माध्यमातून अनलॉक झाला. या मालिकेत भारतीय महिला संघासह स्मृती मानधनाची कामगिरीही निराशजनक झाली होती. त्यामुळे आपल्या कामगिरीतील पूर्वीचा तोरा परत आणण्याच्या इराद्याने स्मृती मानधना मैदानात उतरेल.

भारतीय महिला संघ 16 जून रोजी इंग्लंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघामध्ये तीन-तीन सामन्यांची टी-20 आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारतीय महिला संघाचे इंग्लंड दौऱ्यावरील वेळापत्रक

  • 16-19 जून, पहिला आणि एकमेव कसोटी सामना काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल

  • 27 जून, पहिला वनडे सामना, काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल

  • 30 जून, दूसरा वनडे सामना, द कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉन्टन

  • 3 जुलै, तीसरा वनडे सामना, न्यू रोड, वर्सेस्टर

  • 9 जुलै, पहिला टी20 सामना, काउंटी ग्राउंड, नॉर्थम्पटन

  • 11 जुलै, दूसरा टी20 सामना, काउंटी ग्राउंड, होव

  • 15 जुलै, तीसरा टी20 सामना, काउंटी ग्राउंड, चेल्म्सफोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.