IBSA World Games : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकले सुवर्णपदक

Indian Womens Blind Cricket Team
Indian Womens Blind Cricket Team
Updated on

IBSA World Games Indian Womens Blind Cricket Team : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे.

बर्मिंगहॅम इंग्लंड येथे होणाऱ्या या खेळांमध्ये प्रथमच टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला, जिथे भारताच्या महिला संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे या खेळांमधील क्रिकेटचा पहिला चॅम्पियन संघ बनला.

Indian Womens Blind Cricket Team
Naseem Shah : 'एक दिवस मला हृदयविकाराचा...' आशिया कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूला मृत्यूची भीती! वक्तव्याने उडाली खळबळ

याशिवाय, भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाने IBSA जागतिक खेळांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. आता भारतीय चाहत्यांना महिला संघानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

मात्र, याआधी IBSA वर्ल्ड गेम्सच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशाप्रकारे साखळी सामन्यात पाकिस्तानला हरवून जेतेपदाच्या लढतीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

IBSA वर्ल्ड गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. दुसरीकडे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 षटकात 8 विकेट गमावत 114 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने 3.3 षटकात 1 गडी बाद 43 धावा केल्या, मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय संघाची विजेता म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.