CWG 2022 : पहिल्या सामन्यापूर्वीच महिला क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव

Indian Womens Cricket Team Two Members Tested Corona Positive Before Commonwealth Games 1st Match
Indian Womens Cricket Team Two Members Tested Corona Positive Before Commonwealth Games 1st Match esakal
Updated on

बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) पहिल्याच दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women's Cricket Team) ऑस्ट्रेलियाबरोबर टी 20 सामना खेळणार आहे. मात्र सामन्याला काही दिवसच शिल्लक असताना संघात कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ दोन खेळाडूंविनाच रविवारी बर्मिंगहमला रवाना झाला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने यापूर्वीच भारतीय महिला संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले होते. भारतीय महिला संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत होता. महिला क्रिकेट संध राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे.

Indian Womens Cricket Team Two Members Tested Corona Positive Before Commonwealth Games 1st Match
Ricky Ponting : पॉटिंगच्या मते टी 20 वर्ल्डकपचे 'हे' असतील फायनलिस्ट

भारतीय ऑलिम्पिक एसोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, 'भारतीय संघातील दुसरी खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही घटना संघ रवाना होण्यापूर्वी घडली. त्यामुळे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू हे भारतातच थांबले आहेत.' दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'नियमानुसार हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरच सामिल होऊ शकतात.'

Indian Womens Cricket Team Two Members Tested Corona Positive Before Commonwealth Games 1st Match
CWG 2022 : लोव्हलिनाच्या वैयक्तिक प्रशिक्षकांना अखेर मिळाला प्रवेश

सध्याची परिस्थिती पाहता दोन खेळाडू ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात खेळतील असे दिसत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत 31 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 3 ऑगस्टला साखळी फेरीतील शेवटचा सामना बार्बाडोस सोबत होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला टी 20 क्रिकेटचे सर्व सामने हे एजबेस्टन येथे खेळवण्यात येणार आहेत. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे महिला क्रिकेटच्या सेमी फायनल आणि फायनलची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहे.

भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी संघाची कर्णधार हरमनप्रीतने खेळाडूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धा कशी महत्वाची आहे हे सांगितले. ती म्हणाली, 'असा अनुभव फार कमी जणांना मिळतो. त्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी उत्सुक आहोत. राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटनचा सोहळा आमच्यासाठी खास असणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.