BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.
Jai Shah
Jai Shahsakal
Updated on

BCCI jay Shah : भारतीय क्रिकेटमध्ये यापुढे महिला आणि पुरुषांमध्ये वेतनाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हा भेदभाव दूर करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल उचलले आहे. सर्वांना समान मॅच फी मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. जय शाह म्हणाले की, आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत.

Jai Shah
IND vs NED : योगायोग! आधी वडील भिडले, आता मुलगा भारताविरूद्ध थोपटणार दंड

बीसीसीआय सचिव म्हणाले की, मला जाहीर करण्यात आनंद होत आहे बीसीसीआय नव्या दिशेने पहिले पाउल टाकले आहे. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी मॅच फी समान असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी 15 लाख रुपये उपलब्ध आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जाणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना 3 लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहा यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत.

Jai Shah
Matthew Wade : यजमान Corona च्या विळख्यात? ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू पॉझिटिव्ह

आयसीसी महिला विश्वचषक 2017 च्या स्पर्धेत अंतिम फेरीत संघ पोहोचल्यानंतर महिला क्रिकेटमध्ये रस वाढला. त्यानंतर संघ 2020 टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. या वर्षी ऑगस्टमध्ये या संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने समान वेतनाबाबत मोठा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.