IndianOil Race Across India: भारतातील प्रतिष्ठित इंडियन ऑइल अल्ट्रा सायकलिंग शर्यतीची दुसरी आवृत्ती १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तब्बल ३,७५८ किमीचे अंतर असलेली ही शर्यत श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे सुरू होऊन कन्याकुमारीत पूर्ण होणार आहे.
ही शर्यत १२ राज्यांमधून प्रवास करताना विविध लँडस्केप, हवामान आणि भूप्रदेशाचा सामना करत पुढे जाणार आहे. या शर्यतीला वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनकडून (डब्ल्यूयूसीए) मान्यता मिळाली असून रेस क्रॉस अमेरिकेचा (आरआरएएम) क्वालिफायर इव्हेंट (आरक्यू) म्हणून काम करते.
बर्फाच्छादित हिमालयाच्या मध्यभागी सुरू होणारा अल्ट्रा सायकलिंगचा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग ४४, भारतातील सर्वात लांब महामार्ग, उत्तरेकडील पर्वतांपासून तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भूमीपर्यंत, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या महत्त्वाच्या भारतीय राज्यांमधून जाईल.
हिमालयाच्या थंडीपासून ते दख्खनच्या पठाराच्या उष्णतेपर्यंत आणि दक्षिणेकडील दमट किनारपट्टीच्या प्रदेशात रायडर्सना हवामानातील बदलाशी जुळवून घेत आगेकूच करावी लागेल.
या रेसमधील सहभागींना यमुना, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा यांसारख्या प्रमुख नद्या ओलांडताना हिमालय, आरवली, विंध्य आणि सातपुडासह महत्त्वाच्या पर्वतराजींमधून १८,२०१ मीटर उंचीवरून सायकल रेसचा अनोखा अनुभव अनुभवता येईल.
आव्हानात्मक भूप्रदेश आणि हवामानातील संक्रमणांसह, ही शर्यत एक-दोन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक रायडर्सच्या मानसिक आणि शारीरिक कणखरतेचा कस लागेल.
एकूण वैयक्तिक सहभाग : १४
रिले संघ २-२ आणि ४-५ संघ
वैयक्तिक रायडर्सनी १२ दिवसांच्या आत शर्यत पूर्ण करणे आवश्यक
चार जणांच्या रिले संघाला आठ दिवसांची वेळ मर्यादा
रिले टीमला १० दिवसांची दोन वेळची मर्यादा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.