Tejas Tiwari : छोटा पॅकेट मोठा धमाका! वयाच्या 5 व्या वर्षी भारताच्या तेजसने बुद्धिबळात केला विश्वविक्रम

Tejas Tiwari Chess World Record
Tejas Tiwari Chess World Record SAKAL
Updated on

Tejas Tiwari Chess World Record : बहुतेक मुले वयाच्या पाचव्या वर्षी काय करतात? शाळेत जातात, अभ्यास करतात, वेगवेगळ्या गोष्टी शिकतात, किंवा खेळतात असे उत्तर असेल. नवनवीन गोष्टी शिकण्याचे हे वय आहे, पण भारताच्या पाच वर्षांच्या तेजस तिवारीने या लहान वयात असा धमाका करून दाखवला आहे, जो मोठ्यांना करता आला नाही. वयाच्या साडेतीन वर्षापासून बुद्धिबळ खेळत असलेल्या तेजसने या खेळात विश्वविक्रम केला आहे.

Tejas Tiwari Chess World Record
ODI World Cup 2023: वर्ल्ड कपचे शेड्यूल बदलले, IND vs PAK सामन्याची तारीखही बदलणार? जय शहा यांनी सांगितले सत्य

बुद्धिबळाची जागतिक प्रशासकीय संस्था FIDE कडून मानांकन मिळवणारा तेजस जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. तेजसचे FIDE मानक रेटिंग 1149 आहे. FIDE ने सांगितले की, उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या पहिल्या दिवंगत धीरज सिंग रघुवंशी खुल्या FIDE रेटेड बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान त्याने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. वयाच्या अवघ्या साडेतीनव्या वर्षी घरातील सदस्यांना खेळताना पाहून तेजसला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.

वयाच्या चौथ्या वर्षी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि लवकरच तो राज्याबाहेरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. तेजसने त्याची पहिली FIDE रेट रॅपिड टूर्नामेंट वयाच्या चार वर्षे आणि तीन महिन्यांत खेळली.

Tejas Tiwari Chess World Record
Wi vs Ind 1st ODI: प्लेइंग इलेव्हनमध्ये नसूनही सॅमसन उतरला मैदानात? नक्की भानगड काय, घ्या जाणून

2022 मध्ये उत्तराखंड राज्य खुल्या स्पर्धेच्या आठ वर्षांखालील गटात तो पहिला आला होता. तेजसचे प्रशिक्षक असलेले त्याचे वडील शरद तिवारीने पीटीआयला सांगितले की, तो दिवसातून दोन ते तीन तास सराव करतो आणि ग्रँडमास्टर आणि विश्वविजेता बनण्याचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.