Chess Olympiad 2024 : भारताच्या 'सुवर्ण' विजायचं पाकिस्तानच्या खेळाडूंकडून सेलिब्रेशन, Video Viral

Indian Chess Team: बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे जगभरातून कौतुक होत आहे.
chess olympiad 2024
chess olympiad 2024esakal
Updated on

Chess Olympiad 2024: नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताने विक्रमी विजय मिळवला. भारताने खुल्या व महिला गटात सुवर्णपदक पटकावले. USSR आणि चीन यांच्यानंतर एकाच ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकणारा भारत तिसरा देश ठरला. भारताने खुल्या गटात एकही सामना न गमवता सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय खेळाडूंचे जगभरात कौतुक होत असताना शेजारी पाकिस्तानही सेलिब्रेशन करताना दिसले. पाकिस्तानी खेळाडूंच्या हातात चक्क तिरंगा दिसल्याने नेटिझन्स आनंदित झाले आहेत.

२०२२ मध्ये चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत यजमान भारताने कांस्यपदक पटकावले होते. याच स्पर्धेत भारताच्या या युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली होती. या स्पर्धेत गुकेश, दिव्या, वंतिका, प्रज्ञानंद, गुकेश, अर्जुन हे नवे चेहरे जगासमोर आले व याच युवा खेळाडूंनी आता जगाला आपले वेड लावले आहे.

chess olympiad 2024
Chess Olympiad 2024: भारताचं पहिलं ऑलिम्पियाड... पाकिस्तान - अफगाणिस्तान ट्रेनप्रवास अन् २०२४ मधील सुवर्णपदक; संघर्षमयी प्रवास

भारतीय पुरूष संघाने स्लोवेनियाविरूद्धच्या शेवटच्या फेरीच्या सामन्यात ३.५-०.५ असा विजय मिळवला व सुवर्णपदक आपल्या नावे केले. भारतीय महिला संघाने अझरबैझानविरुद्ध ३.५-०.५ ने विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले आहे. १९५६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने ६८ वर्षांनी सुवर्णपदक जिंकले. या युवा खेळाडूंच्या अद्भूत कामगिरीसाठी भारतीय बुद्धिबळ महासंघाने खेळाडूंना एकूण ३.२ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Chess Profesionals
Chess ProfesionalsEsakal

हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल व आर. वैशाली यांनी भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय पुरूष संघाची धुरा डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद व अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी यांच्याकडे होती. पाकिस्तान बुद्धिबळ संघाने देखील भारताच्या या ऐतहासिक विजयाचा आनंदोस्तव साजरा केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तान खेळाडू भारतीय तिरंगा हाती घेऊन फोटो काढताना पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.