Chess Olympiad सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचं रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रेशन, 'रोबो वॉक' करत उंचावली ट्रॉफी, पाहा Video

India Chess Teams Celebration like Rohit Sharma: बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकानंतर भारतीय खेळाडूंनी रोहित शर्मा स्टाईलमध्ये जोरदार सेलिब्रेशन केले.
India Chess Teams Celebration like Rohit Sharma
India Chess Teams Celebration like Rohit SharmaSakal
Updated on

India Clinched historical Gold at Chess Olympiad 2024: भारताच्या बुद्धिबळपटूंनी रविवारी इतिहास रचला आहे. बुडापेस्ट, हंगेरी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सुवर्णपदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत अनेक मातब्बर खेळाडूंना पराभवाचा धक्का देत सुवर्णपदकापर्यंत मजल मारली. या ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या दोन्ही संघांनी एकत्र जोरदार सेलिब्रेशन केले. सध्या भारतीय खेळाडू बुद्धिबळ खेळात गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्व ठेवून असल्याचे दिसत आहे.

India Chess Teams Celebration like Rohit Sharma
Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

दरम्यान, सुवर्णपदक जिंकल्यानंतर पोडियमवर असताना भारतीय खेळाडूंचे भन्नाट सेलिब्रेशन पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओही सध्या व्हायरस होत आहे. त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या सेलिब्रेशन सारखी झलक दिसली.

भारतीय क्रिकेट संघाने जूनच्या अखेरीस रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली होती. हे विजेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्माने रोबो वॉक करत ट्रॉफी संघाबरोबर उंचावली होती. याच सेलिब्रेशन प्रमाणे भारताच्या संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सेलिब्रेशन केले.

यावेळी भारताचे खेळाडू डी गुकेश आणि तानिया सचदेव ट्रॉफी घेऊन रोबो वॉक करताना दिसले, तर भारताचे बाकी खेळाडू पोडियमवर उभे होते. त्यांनंतर गुकेश आणि तानिया जवळ आल्यानंतर सर्वांनी मिळून जल्लोष केला. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

India Chess Teams Celebration like Rohit Sharma
भारताची Chess Olympiad स्पर्धेतील मानाची ट्रॉफी चोरीला? AICFच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

भारतीय संघ

भारताच्या पुरुष संघात डी. गुकेशसह आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी, पी हरीकृष्णा हे खेळाडू होते. महिला संघात दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, आर. वैशाली, हरिका डी आणि तानिया सचदेव यांचा समावेश होता.

भारताची कामगिरी

भारताचा पुरुष संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजीत राहिला. भारताच्या संघाने ११ पैकी १० फेऱ्या जिंकल्या. त्यांना केवळ उझबेकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी स्विकारावी लागली.

तसेच भारताच्या महिला संघाने ११ पैकी ९ फेऱ्यांमध्ये विजय मिळवला. भारताच्या महिला संघाला फक्त पोलंडकडून पराभवाचा धक्का बसला, तसेच अमेरिकेविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.