India at Paralympics 2024 Iran's Beit Sayah's Disqualification : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारी आश्चर्याची गोष्ट घडली. पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 गटात नवदीप सिंगने ( Navdeep Singh ) रौप्यपदक जिंकून दिले होते. परंतु, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या इराणच्या BEIT SAYAH Sadegh वर अपात्रतेची कारवाई केली गेली आणि त्यामुळे नवदीपच्या रौप्यपदकाचे रुपांतर सुवर्णमध्ये झाले. त्यामुळे भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्यसह एकूण २९ पदके जिंकली आहेत. सध्या भारत पदकतालिकेत १८व्या क्रमांकावर आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हरयाणाच्या नवदीपला २०२०च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत F41 प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आज त्याने तिसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटरसह पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. चीनच्या सून पेंगिझिआंगचा २०२१मध्ये टोकियोतील ४७.१३ मीटरचा पॅरालिम्पिक विक्रम नवदीपने मोडला. इराणच्या सयाह सहेघ बेतने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ४६.८४ मीटर अंतर पार करून अव्वल स्थान जिंकले होते, परंतु नवदीपने त्याला मागे टाकले.
पण, इराणच्या बेतने त्याच्या पाचव्या प्रयत्नात ४७.६४ मीटर भालाफेकून भारतीय खेळाडूचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला आणि अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी त्याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून वॉर्निंग दिली होती. नवदीपचा सहावा प्रयत्न फाऊल ठरल्याने इराणी खेळाडूचे सुवर्ण अन् भारताचे रौप्यपदक पक्के झाले आणि चिनी खेळाडूला कांस्यपदक मिळाले होते.
पण, सामन्यानंतर इराणच्या खेळाडूला R8.1 या नियमानुसार अखिलाडूवृत्ती किंवा चुकीच्या कृतीमुळे अपात्र ठरवले गेले. त्याला नेमकं कोणत्या कारणावरून अपात्र ठरवले गेले, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. इराणी खेळाडूला अपात्र ठरवल्याने नवदीपचे रौप्य सुवर्ण झाले अन् चीनच्या सूनचे कांस्य रौप्यपदक झाले. इराकच्या विल्डन नुखाईवी ( ४०.४६ मी.) याला कांस्यपदक मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.