India at Paria Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली आहे. शुक्रवारी भारताच्या खात्यातील तिसरे पदक प्रीती पाल हिने मिळवून दिले. तिने महिलांच्या T35 १०० मीटर प्रकारात कांस्य पदक जिंकले. तिने तिची सर्वोत्तम कामगिरी करताना हे पदक जिंकले.
पॅरालिम्पिकमधील ऍथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारातील हे भारताचे पहिले-वहिलेच पदक ठरले आहे. २३ वर्षीय प्रीतीने १४.२१ सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदक नावावर केले.
या प्रकारात चीनच्या झोऊ शियाने १३.५८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तर चीनच्याच गुओ क्विआनक्विआनने रौप्य पदक जिंकले आहे.