रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी विराट 'राजी'; स्वत: दिली माहिती

रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरण कोहलीने दिले आहे.
Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohliesakal
Updated on

Indias Tour Of South Africa Virat Kohli Press Conference : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार असल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आफ्रिका दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने अनेक मुद्यावर भाष्य केले. भारतीय संघात नेतृत्व बदल झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे सामन्यातून कोहली माघार घेणार, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला कोहलीने पूर्ण विराम दिलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल (Virat Kohali Available ODI) असे त्याने स्पष्ट केले. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरणचं कोहलीने दिले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी संघाची निवड होताच भारतीय संघाच्या वनडेतही मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून वनडेची मदार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर कोहली वनडेतून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली होती. कोहलीने वनडे मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे सांगत या चर्चेला आता पूर्ण विराम दिला.

Rohit Sharma Virat Kohli
'विराट कोहलीला बीसीसीआयने साधे थँक यू देखील म्हटलं नाही'

कोहली म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेतून विश्रांती घेण्यासंदर्भात बीसीसीआयशी कोणतीही चर्चा केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे सामन्यासाठी मी उपलब्ध आहे. कसोटी संघाची निवड करताना बीसीसीआयच्या निवड समिती संदस्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. या बैठकीत कसोटी संघ निवडीची चर्चा झाली. याचवेळी एकदिवसीय संघाचे नेतृत्व माझ्याकडे राहणार नाही, असे सांगण्यात आले. याबद्दल मला कोणताही आक्षेप नव्हता, असे कोहलीने म्हटले आहे.

Rohit Sharma Virat Kohli
विराट-कुंबळेंच्या वादाचे कारण ठरलेल्या चायनामनचा बर्थडे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रियंक पांचाल (रोहित शर्माची रिप्लेसमेंट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.