Indonesia Football Match Lightning : क्रीडा जगतासाठी एक धक्कादायक दु:खद बातमी समोर आली आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान एका खेळाडूवर वीज पडली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. इंडोनेशियातील एका सामन्यादरम्यान ही घटना घडली.
इंडोनेशियातील दोन क्लबमध्ये मैत्रीपूर्ण हा सामना शनिवारी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सिलीवांगी स्टेडियमवर खेळला जात होता. यादरम्यान, सामना खेळणाऱ्या एका खेळाडूवर ही वीज पडली.
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सामना खराब हवामानात खेळला जात होता. दरम्यान, मैदानाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या खेळाडूवर अचानक वीज पडली. व्हिडीओमध्ये विजांच्या कडकडाटादरम्यान भीषण आग दिसत आहे. ती वीज होती. विजेचा धक्का लागलेला खेळाडू लगेच मैदानावर पडला.
विजेचा स्फोट इतका जोरदार होता की जवळ उभा असलेला दुसरा खेळाडूही जमिनीवर पडला. पण तो काही वेळाने उठतो. बाकीचे खेळाडू स्वत:चा बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपले, तर काही बाहेर पळू लागले.
पण ज्या खेळाडूवर वीज पडते तो तसाच पडून राहला. इतर खेळाडू आणि वैद्यकीय पथक त्याची जवळ आले. खेळाडूला ताबडतोब स्ट्रेचरवर बाहेर काढले जाते. या वेळी तो श्वास घेत होता. यानंतर त्याला रुग्णालयात घेऊन गेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू होतो. रुग्णालयात डॉक्टरांनी त्या खेळाडूला मृत घोषित केले.
गेल्या 12 महिन्यांत इंडोनेशियन फुटबॉलपटूला विजेचा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. 2023 च्या सोराटिन अंडर-13 कपदरम्यान बोजोंगोरो पूर्व जावा येथे एका फुटबॉलपटूला विजेचा धक्का बसला होता. त्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या इतर 6 खेळाडूंनाही विजेचा धक्का बसला. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी सर्वांचे प्राण वाचवले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.