भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही

International Kabaddi Federation India : आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने भारतीय कबड्डी संघटनेवर निलंबनाची कारवाई केली आहे.
AKFI
AKFIesakal
Updated on

Amateur Kabaddi Federation of India banned: भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ २५-३० सप्टेंबर पासून इराणमध्ये सुरू होणाऱ्या सीनियर वर्ल्ड बीच कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळू शकणार नाही. कारण, आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने भारतीय कबड्डी संघटनेवर ( AKFI) बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे भारतीय पुरुष व महिला संघांना कोणत्याची जागतिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन (IKF)ने भारतीय हौशी कबड्डी फेडरेशन (AKFI)ला निलंबित केले आहे. भारतीय संघटनेतील अंतर्गत वादामुळे आंतरराष्ट्री महासंघाला हा निर्णय घ्यावा लागला. यामुळे जागतिक बीच कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसोबतच भारताला नोव्हेंबरमध्ये थायलंड येथे होणाऱ्या सहाव्या आशियाई इनडोअर स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

AKFI
IND vs BAN: ऋषभ पंत अन् Shubman Gill यांचा शतकी धमाका; भारताने ४ बाद २८७ धावांवर केला डाव घोषित

गेल्या पाच वर्षांपासून न्यायमूर्ती एसपी गर्ग AKFI चा कारभार सांभाळत आहेत. परंतु AKFI न्यायालय-नियुक्त प्रशासकचा सहभागास नियमांचे उल्लंघन मानते. AKFI नियमानुसार राष्ट्रीय क्रीडा महासंघ चालविण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सदस्यांची आवश्यकता असते. या कारणामुळे आयकेएफने भारतीय संघटनेला कबड्डी स्पर्धांमधून निलंबित केले आहे.

आयकेए(IKF)चे अध्यक्ष विनोद तिवारी यांनी सांगितले की, “एकेएफआयला निलंबित केले गेले आहे आणि जर त्यांनी निवडणुक घेऊन प्रतिनिधींना संघटना चालवण्यासाठी नियुक्त केले नाही तर ते आगामी स्पर्धांमध्ये देखील निलंबितच राहतील.”

AKFI
IND vs BAN 1st Test : 634 दिवसांनी कसोटी खेळला अन् Rishabh Pant ने झळकावले शतक; महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय कबड्डीचे भवितव्य

आयकेएफ(AKFI)च्या निलंबनामुळे भारतीय कबड्डीचे भविष्य संकटात आले आहे. कबड्डीमधील खेळाडू आता महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनापासून वंचित राहतील. ज्यामुळे त्यांचा विकास थांबू शकतो. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धा नसल्यामुळे भारतात आणि जागतिक स्तरावर कबड्डी वाढवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.