लौसाने : रशिया आणि बेलारूस या देशांतील खेळाडूंना पून्हा स्पर्धात्मक सामन्यांत ‘तटस्थ’ म्हणून संधी देण्याच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी पाठराखण केली आहे. युक्रेनवर या दोन देशांकडून हल्ले होत असले, तरी खेळाच्या मैदानात रशिया आणि बेलारूस या देशांतील खेळाडूंना संधी मिळणे हे नैसर्गिक आहे, असे बाख यांचे म्हणणे आहे.
युक्रेनशी युद्ध केल्यामुळे आयओसीनेच रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर फेब्रुवारी २०२२ पासून बंदी घातली होती, परंतु हे वर्ष २०२४ मधील पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता स्पर्धांचे असल्यामुळे या दोन देशांच्या खेळाडूंना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयओसी विचार करत आहे.
या वर्षात आशिया तसेच इतर आंतरराष्ट्रीय पात्रता स्पर्धा होणार आहेत. विविध खेळांच्या फेडरेशननी स्पर्धांची तयारीही सुरू केली आहे, परंतु रशिया, बेलालूर या देशांतील खेळाडूंना पुन्हा संधी दिली जाणार असेल तर आम्ही पॅरिस ऑलिंपिकवर बहिष्कार टाकू अशी धमकी युक्रेनने दिली आहे.
लौसाने या आयसोसीच्या मुख्यालयात होत असलेल्या कार्यकारी सदस्यांच्या बैठकीपूर्वी बाख यांनी रशिया आणि बेलारूस देशांतील खेळाडूंचे पासपोर्ट कार्यन्वित रहातील असे मत व्यक्त केले. सायकलिंग, टेबल टेनिस, टेनिस अशा खेळांच्या स्पर्धा वाढत आहेत. आईस हॉकी, हँडबॉल, अमेरिकेतील फुटबॉल आणि इतर लीग यांची संख्या आता वाढत आहे असेही बाख म्हणाले.
टेनिसमध्ये तीव्र प्रतिक्रिया
रशिया आणि बेलारूस या देशांतील खेळाडू काही स्पर्धांमध्ये तटस्थ देशांतील खेळाडू म्हणून सहभागी होत आहेत, परंतु इतर खेळांच्या तुलनेत टेनिसमध्ये मात्र त्यांच्या सहभागावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
ज्या देशांत स्पर्धा होत आहेत, तेथील सरकारे रशिया आणि बेलारूस देशांतील खेळाडूंना काही अपवाद वगळता व्हिसा देत आहेत; मात्र केवळ खेळापुरतेच हे व्हिसा आहेत, अशी माहिती बाख यांनी दिली. त्याचबरोबर भारतात झालेल्या महिला विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत डझनभर देशांनी निषेध म्हणून बहिष्कार घातला होता हे सत्यही बाख यांनी मांडले.
आम्हाला शिक्षा का देत आहात, आम्हाला पुन्हा खेळण्याची संधी द्या, अशी मागणी जवळपास ३०० हून अधिक तलवारबाजांनी बाख यांच्याकडे केलेली आहे. तर जोपर्यंत हे युद्ध सुरू आहे, तोपर्यंत रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी जर्मनीतील एलिट अॅथलीटसनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.