Olympic Day : वर्गणी काढून भारताचे खेळाडू झाले होते सहभागी

Olympic Day : वर्गणी काढून भारताचे खेळाडू झाले होते सहभागी
-
Updated on
Summary

जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जात आहे. भारतानेची ऑलिम्पिकमध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. अधिकृतरित्या भारताने ऑलिम्पिकमध्ये 1920 ला सहभाग घेतला होता. यामध्ये भारताकडून सहा खेळाडू सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही. पुढच्या महिन्यात टोक्योमध्ये ऑलिम्पिकच्या खेळांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, आज जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जात आहे. भारतानेची ऑलिम्पिकमध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. अधिकृतरित्या भारताने ऑलिम्पिकमध्ये 1920 ला सहभाग घेतला होता. यामध्ये भारताकडून सहा खेळाडू सहभागी झाले होते. ऑलिम्पिकच्या खेळांचा इतिहास जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. मात्र याचे पहिल्यांदा आयोजन हे 1896 मध्ये झाले होते. त्याआधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 रोजी झाली होती. आयओसीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने 1948 पासून ऑलिम्पिक दिवस साजरा केला जाऊ लागला.

आयओसीचे पहिले अध्यक्ष डेमट्रियोस विकेलास हे होते. सध्या स्वित्झर्लंडमध्ये आयओसीचे मुख्यालय असून जगभरात 250 सदस्य आहेत. ऑलिम्पिक दिवस साजरा करण्याचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये प्रत्येक वयोगटातील, वर्गातील लोकांनी सहभाग घ्यावा, त्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. आयओसीकडून दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. भारताने पहिल्यांदा 1900 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळ नॉर्मन प्रिचर्ड यांनी दोन पदकं जिंकली होती. मात्र अधिकृतपणे भारत 1920 मध्ये पहिल्यांदा सहभागी झाला होता.

Olympic Day : वर्गणी काढून भारताचे खेळाडू झाले होते सहभागी
WTC फायनल निकाली लावण्यासाठी गावसकरांचा ICC ला सल्ला

दोराबजी टाटांनी घेतला पुढाकार

1920 मध्ये भारताच्या सहा खेळाडूंनी एंटवर्प ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी देशातून वर्गणी काढून, तसंच उद्योगपती दोराबजी टाटा यांच्या मदतीने खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पाठवण्यात आलं होतं. 1907 मध्ये जमशेदपूर इथं टाटा स्टीलची स्थापना झाली होती. जमशेदजी टाटांचा मोठा मुलगा असलेले दोराजबी हे रतन टाटा यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. जमशेदजी टाटा यांच्या निधनानंतर दोराबजी टाटा यांच्यावर कंपनीची जबादारी पडली होती. दोराबजी यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं. त्यांना पुण्यातील डेक्कन जिमखान्याचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पहिली अॅथलेटिक्स मीट 1919 मध्ये आयोजित केली. यात शेतकरी कुटुंबातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. धावणाऱ्या खेळाडुंना अॅथलेटिक्स किंवा त्याचे नियम याबद्दल काहीच माहिती नव्हती. यातल्या काही खेळाडूंचे टायमिंग के ऑलिम्पिक क्वालिफाय करण्याइतकं होतं. दरम्यान, त्यांनी या खेळाडूंना 1920 च्या ऑलिम्पिकला पाठवण्याचा प्रस्ताव दिला. तत्कालीन गव्हर्नरकडून यासाठी भारताला परवानगी मिळाली. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

वर्गणी काढून पाठवले खेळाडू

1920 च्या ऑलिम्पिकसाठी सहा खेळाडूंची निवड करण्यात आली होती. खेळाडूंची निवड झाली मात्र त्यांना स्पर्धेसाठी पाठवण्याचं आव्हान होतं. आर्थिकदृष्ट्या खेळाडू सक्षम नव्हते. त्यावेळी प्रवासासह इतर खर्चासाठी 35 हजार रुपयांची गरज होती. तेव्हा जिमखान्याकडून वृत्तपत्रात जाहिरात देऊन वर्गणी गोळा केली होती. तत्कालीन सरकारने फक्त सहा हजार रुपये दिले होते. शेवटी वर्गणीतून मिळालेल्या पैशात तीन खेळाडू आणि दोराबजी टाटा यांनी स्वत:च्या पैशांनी तीन खेळाडूंची सोय केली. या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये फारशी चमक दाखवता नाही. पण भारताच्या ऑलिम्पिकमधील अधिकृत अशा प्रवासाला सुरुवात तेव्हा झाली.

Olympic Day : वर्गणी काढून भारताचे खेळाडू झाले होते सहभागी
डेन्मार्कची क्वालिफाय कॉलिटी!

आतापर्यंत भारताला 28 पदकं

भारताने 1928 मध्ये अॅमस्टरडम ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळालं होतं. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी झाली होती. त्यानंतर सलग सहा वेळा भारताच्या हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. आतापर्यंत भारताला ऑलिम्पिकमध्ये एकूण 28 पदकं जिंकता आली आहेत. यामध्ये 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.