'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

International Cricket Ground : कोल्हापूरला फुटबॉल खेळाची जशी संस्थान काळापासून परंपरा आहे, तशीच परंपरा क्रिकेट खेळालाही आहे.
International Cricket Ground
International Cricket Groundesakal
Updated on
Summary

राज्य शासनाने विकासवाडी (ता. करवीर) येथे क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानासाठी ३० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.

-सचिन भोसले

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील एमआयडीसीच्या ताब्यातील ३० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान (International Cricket Ground) साकारणार आहे. याचा प्राथमिक आराखडा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) कडून तयार केला आहे. यात ७० यार्डचे मुख्य मैदान, प्रेक्षक गॅलरी, पॅव्हेलियन, अंतर्गत सरावासाठी छोटे मैदान, खेळपट्ट्या, ॲकॅडमी, भव्य असे पार्किंग, खेळाडूंसाठी निवास व्यवस्था याचा अंतर्भाव असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.