Babar Azam : बाबर आझमची कर्णधारपदावरून होणार उचलबांगडी? पाक चीफ सेलेक्टरने केले मोठे व्यक्तव्य

inzamam ul haq speaks on babar azam
inzamam ul haq speaks on babar azam
Updated on

आगामी आशिया कप आणि अफगाणिस्तान मालिकेसाठीचा संघ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी जाहीर केला. अलीकडेच माजी कर्णधार इंझमाम-उल-हक पुन्हा एकदा मुख्य निवडकर्ता म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे परत आले. बुधवारी संघ जाहीर झाल्यानंतर इंझमामने पत्रकार परिषद घेतली आणि संघ निवडीशी संबंधित अनेक उत्तरे दिली.

याशिवाय त्याने बाबर आझमचे कर्णधारपद आणि त्याच्या भविष्याबाबतही वक्तव्य केले. 2020 मध्ये सर्फराज अहमदनंतर बाबरने वनडे संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर तो आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार झाला.

inzamam ul haq speaks on babar azam
IND vs WI 2nd T20 Playing 11 : पराभवानंतरही हार्दिक करू शकत नाही आपल्या प्लेईंग 11 मध्ये बदल

इंझमाम-उल-हकने आपल्या भविष्याबाबत पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. बाबर आझमने आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 17 वेळा पाकिस्तानी संघाने विजय मिळवला आहे. तो प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात संघाची धुरा सांभाळणार आहे.

पण 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ फायनलपर्यंत आणि 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंत गेला होता. याशिवाय त्याचा संघ आशिया कप 2022 मध्ये अंतिम सामनाही खेळला होता आणि उपविजेता ठरला होता.

त्याच्याच नेतृत्वाखाली पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला कोणत्याही विश्वचषकात पराभूत केले आणि तो क्षण 2021 च्या T20 विश्वचषकात आला जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव झाला.

inzamam ul haq speaks on babar azam
Disney+ Hotstar loses : डिस्ने+ हॉटस्टारला आयपीएलमुळे बसला मोठा धक्का! 1.2 कोटी सबस्क्राईबर गायब अन्...

आता इंझमाम-उल-हकने बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत वक्तव्य केले आहे. सर्वप्रथम त्याने कर्णधारपदात फारसे बदल करू नयेत, असे स्पष्ट केले. बरेच बदल चांगले नाहीत. आम्हाला वाटते की बाबर चांगला कर्णधार आहे. यापूर्वी मी मुख्य निवडकर्ता असताना सरफराज तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार नव्हता. मात्र, नंतर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदही सुरू केले. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असावा असे मला वाटते. कर्णधाराला आपल्या खेळाडूंना पुढे कसे न्यायचे हे माहित असणे आवश्यक आहे. पण हे कर्णधारपद माझ्या अखत्यारीत येत नाही.

inzamam ul haq speaks on babar azam
Baba Aparajith : धोनीकडून काही शिकला नाही! बाद झाल्यावर आधी अंपायरशी नंतर खेळाडूंशी भिडला

आशिया कप 30 ऑगस्टपासून पाकिस्तानमध्ये सुरू होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी, ही स्पर्धा संकरित पद्धतीने आयोजित केली जात आहे. त्याचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. टीम इंडियाचे उर्वरित सामने श्रीलंकेत होतील.

या स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना इंझमाम म्हणाला की, आम्ही विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंची निवड केली आहे. हा संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया. विशेष म्हणजे 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.