CSK सह MI, RR, SRH चे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती

IPL
IPLSAKAL
Updated on

देशातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत बायोबबलच्या सुरक्षा कवचाखाली सुरु असलेली आयपीएल स्पर्धा संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन आणि बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह चेन्नई सुपर किंग्जच्या बसच्या ड्रायव्हरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवीर आयपीएलमधील स्पर्धा ठराविक सहा मैदानावर खेळवण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील सामने हे मुंबईच्या वानखेडे आणि चेन्नईच्या मैदानात रंगले. त्यानंतर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमसह अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर दुसऱ्या टप्प्यात सामने खेळवण्यात येत आहेत.

IPL
IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

कोलकाता नाईट रायडर्सची टीम सध्या अहमदाबादमध्ये आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ दिल्लीत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी चेन्नईने मुंबई इंडियन्ससोबत सामना खेळला होता. त्यामुळे या संघातील खेळाडू एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. रविवारी दिल्लीच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यावेळी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जे ग्राऊंडमन ड़्युटीवर होते. त्यातील पाच जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. हे कर्मचारी खेळाडूंच्या संपर्कात आल्यामुळे आता सर्व खेळाडूंची टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात शिरलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिल्लीमध्ये असलेल्या इतर संघातील खेळाडूंपर्यंत पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे.

स्पर्धेपूर्वीच मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील ग्राउंड स्टाफ आणि काही खेळांडूचे रिपोर्ट आले होते पॉझिटीव्ह

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील सुरुवातीच्या टप्प्यातील सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि चेन्नई येथे पार पडले. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी वानखेडेच्या मैदानातील ग्राउंडसमनचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय महाराष्ट्रात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवीर राज्य सरकारने लॉकडाउन पुन्हा लागू केला. एका बाजूला पुन्हा कठोर निर्णय लागू होत असताना दुसऱ्या बाजूला आयपीएल स्पर्धा खबरदारीसह सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे म्हटले होते.

IPL
कोलकातानंतर चेन्नईच्या गोटात कोरोना; तिघे पॉझिटिव्ह

BCCI ला बायोबबलच्या कवचात स्पर्धा यशस्वी पार पडण्याचा विश्वास आला कुठून

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्व खेळ लॉकडाऊन झाले. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून ऑस्ट्रेलियात रंगणारी क्रिकेट टी20 वर्ल्डकप स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा निर्णय घेतला. बायोबबलच्या वातावरणात विशेष खबरदारी घेऊन स्पर्धाला सुरुवात झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी चेन्नईच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त आले. कोरोनातून सावरुन खेळाडू स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात संघात खेळतानाही दिसला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर बीसीसीआयने यंदाची स्पर्धा आयोजित केली. देशात संकटजन्य परिस्थितीत असताना आयपीएलला परवानगी कशी? असा प्रश्नही उपस्थिती करण्यात आला. मात्र योग्य ती खबरदारीसह स्पर्धा यशस्वी करण्याचा विश्वास बीसीसीआयच्या भूमिकेत दिसला.

BCCI चा परदेशातील यशस्वी प्रयोग देशात फेल ठरणार

युएईतील स्पर्धेवेळी बायोबबलचे वातावरण तयार करण्यासाठी बीसीसीआयने पाण्यासारखा पैसा खर्च केला. याशिवाय वेळोवेळी खेळाडू आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या स्टाफ मेंबर्सची टेस्ट चाचणीसाठी वेगळे पैसे खर्च केले. भारतातही अशाच प्रकारचा प्रयोग सुरु आहे. सुरुवातीला काही खेळाडू आणि ग्राउंडमनचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही यातून उभे राहून स्पर्धा सुरुच ठेवण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली. मात्र निम्मी स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धेच्या नियोजनात काहीतरी उणीव राहिल्याची शक्यता निर्माण झाली आहे. परदेशातील प्रयोग देशात अपयशी ठरण्याच्या दिशेने जाताना दिसतोय.

नकळतपणे खेळाडूंना प्रोटोकॉलाच विसर पडलाय

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर इंग्लंडच्या मैदानातून क्रिकेट अनलॉक झाले. यावेळी आयसीसीने काही कठोर नियम केले. बॉलला थूंकी लावण्यावर निर्बंध आले. एवढेच नाही तर एकमेकांच्या हातात-हात देऊन हस्तांदोलन न करणे यासारख्या बारीक गोष्टींचाही यात समावेश होता. पण आयपीएलच्या सामन्यादरम्यान काही गोष्टी होताना दिसताहेत. मैदानात खेळाडू आनंद व्यक्त करताना एकमेकांना टाळी देताना दिसले आहे. एवढेच नाही तर बायोबबलमध्ये पहिल्याप्रमाणे स्ट्रीक्ट वातावरण राहिले नाही, असा प्रश्नही उपस्थितीत होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.