VIDEO : धोनीनं आधी केली षटकारांची बरसात; मग रंगला बॉल शोधण्याचा खेळ!

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दुबईत पोहचल्यानंतर क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करुन सरावाला सुरुवात केलीये.
MS Dhoni
MS DhoniTwitter
Updated on

IPL 2021 आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने UAE च्या मैदानात 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहेत. गतवर्षी युएईच्या मैदानात फ्लॉप शो पदरी पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या स्पर्धेत धमाका करण्यासाठी कसून सरावाला सुरुवात केलीये. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दुबईत पोहचल्यानंतर क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करुन सरावाला सुरुवात केलीये.

सराव सत्रावेळी धोनीने चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने उत्तुंग फटकेबाजी करत बॉल थेट ग्राउंडबाहेरील झाडाझुडपात मारला. त्यानंतर त्याच्यासह संघातील इतर खेळाडू बॉल शोधताना दिसले.

CSK ने सोशल मीडियावरुन शेअर केला व्हिडिओ

धोनीची फटकेबाजी आणि त्यानंतर चेंडू शोधण्यासाठी रंगलेल्या खेळाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. CSK ने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात धोनीने सलग पाच षटकार खेचल्याचे पाहायला मिळते. या व्हिडिओत धोनीचा आवाजही येतोय. 4 बॉल म्हणत 14 चेंडू खेळलो असे धोनी म्हणत आहे.

MS Dhoni
'म्हणून लगेच विराट कोहली 'टीम इंडिया'साठी निरूपयोगी झाला का?'

UAE मध्ये आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यानंतर ठरणार यंदाचा विजेता

IPL 2021 स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील स्पर्धा ही भारतामध्ये रंगली होती. काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 29 सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. आता स्पर्धेतील उर्वरित 31 सामने युएईच्या मैदानात रंगणार आहे. शारजा, अबुधाबी आणि दुबईतील मैदानात उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होईल.

MS Dhoni
इंग्लंडमध्ये विरुष्काचं सेलिब्रेशन; हॉटेल स्टाफसोबतचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतरच्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वलस्थानी असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीचा संघ आपले स्थान आणखी उंचावून यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.