इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने युएई (UAE) मध्ये रंगणार आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा संघ स्पर्धेसाठी राजधानी दिल्लीहून युएईला रवाना झालाय. दिल्ली कॅपिटल्स संघाने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत संघातील खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाल्याची माहिती चाहत्यांना दिलीये. दिल्ली कॅपिटल्सने फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिलंय की, संघ स्पर्धेसाठी उत्सुक असून मास्कच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, याची खात्री बाळगूयात, असे दिल्ली कॅपिटल्सने म्हटले आहे. दिल्ली कॅपिटल्सने संघातील खेळाडू युएईत पोहचल्याची माहितीही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिलीये.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यासह देशांतर्गत क्रिकेटर आणि स्टाफ सदस्य युएईला रवाना झाले आहेत. संघातील इतर खेळाडू आपापला आंतराष्ट्रीय दौरा आटोपून युएईला संघात सामील होणार आहेत. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागेवर रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले. पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसरीकडे दिल्लीतील इतर खेळाडूंपूर्वीच श्रेयस अय्यर युएईला रवाना झाला असून त्याने सरावालाही सुरुवात केलीये.
पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंतच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक सामन्यातील विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. युएईच्या मैदानता जेतेपद पटकवण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. अय्यरच्या कमबॅकनंतर दिल्लीची कॅप्टन्सी पंतकडे राहणार की अय्यर पुन्हा नेतृत्व करणार यासंदर्भात टीम व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट केलेली नाही. अय्यरच्या नेतृत्वाखाली मागील आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबई इंडियन्सकडून फायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.