IPL 2021 11th Match: शिखर धवनची 92 धावांची जबऱ्या खेळी आणि त्याला इतर फलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला 6 विकेट राखून पराभूत केले. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या विजयासह 4 गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने दिल्लीच्या डावाला सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. पृथ्वी 32 धावांची उपयुक्त खेळी करुन परतल्यानंतर स्मिथ मैदानात आला. पण तो फार काळ मैदानात टिकला नाही. तो 9 धावा करुन माघारी फिरला. रिषभ पंत 16 चेंडूत 15 धावा करुन परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिसने 13 चेंडूत नाबाद 27 आणि ललित यादवने 6 चेंडूत नाबाद 12 धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
IPL 2021, RCB vs KKR : मॅक्सवेल समोरच पडिक्कलने केली त्याची कॉपी (VIDEO)
मयांक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते. वानखेडेच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि मयांकने संघाला दमदार सुरुवात करुन दिली दोघांनी पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दिपक हुड्डाने 13 चेंडूत 22 धावा करत संघाची धावसंख्या 195 पर्यंत पोहचवली. सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिल्याचा मध्यफळीतील फलंदाज क्रिस गेल आणि निकोलस पूरनला फायदा उठवता आला नाही. हे दोघेही स्वस्तात माघारी फिरल्यामुळे पंजाबला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
180-4 : रिचर्डसनन पंतलाही धाडले तंबूत, एका षटकाराच्या मदतीने त्याने 16 चेंडूत केल्या 15 धावा
IPL 2021 : गब्बर बोल्ड: नव्वदीच्या घरात असा शॉट कोण खेळत? (VIDEO)
152-3 : शिखर धवनचे शतक हुकले. 92 धावांवर रिचर्डसनने केलं बोल्ड
107-2 : स्टीव्ह स्मिथला संधीच सोन करण्यात अपयश, मेरेडिथनं रिचर्डसनकरवी केलं झेलबाद
59-1 : अर्शदीपनं पृथ्वीचा शो थांबवला, त्याने 17 चेंडूत 32 धावा केल्या
पंजाब किंग्ज निर्धारित 20 षटकात 4 बाद 195 धावा; दिल्ली कॅपिटल्ससमोर 196 धावांचे आव्हान
179-4 : निकोलस पूरन 9 धावा करुन माघारी, आवेश खानने घेतली विकेट
158-3 : क्रिस वोस्कसने स्फोटक ख्रिस गेलला 11 धावांवर धाडले माघारी
141-2 : अखेर रबाडाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला तंबूत धाडले. राहुलने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या
लोकेश राहुल आणि मयांक या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली
122-1 : मयांक अग्रवालच्या 69 (36) रुपात पंजाबला पहिला धक्का, मेरिवालाच्या ओव्हरमध्ये धवनने पकडला कॅच
लोकेश राहुल आणि मयांकने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
पंतने टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.