IPL 2021: आयपीएल स्पर्धेच्या २०२१ च्या हंगामातील उर्वरित टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारतात ही स्पर्धा रंगली होती पण कोरोनाचा फटका बसल्यामुळे ही स्पर्धा थांबवण्यात आली. आता T20 World Cup च्या आधी IPL 2021 चा दुसरा टप्पा दुबईत रंगणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यांमध्ये दिल्लीचा संघ ८ सामन्यात १२ गुणांसह अव्वल आहे. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी पंतच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. पण आता श्रेयस अय्यर तंदुरूस्त असल्याने पंतचे कर्णधारपद जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
"दिल्ली कॅपिटल्स संघ शनिवारी पहाटेच्या वेळी युएईसाठी प्रयाण करेल. दिल्लीचे स्थानिक खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील स्टाफ युएईला शनिवारी जातील. स्थानिक क्रिकेटपटू सध्या क्वारंटाईन आहेत. ते युएईमध्ये उतरल्यावर तेथे सगळ्यांचे एका आठवड्याचे क्वारंटाइन असेल. त्यानंतर ट्रेनिंग कॅम्प सुरू होईल. दिल्लीचा कर्णधार कोण असेल याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. पंत किंवा अय्यर यापैकीच एक खेळाडू संघाचे नेतृत्व करेल. संघ व्यवस्थापनाने याबद्दल अजून निर्णय घेतलेला नाही", अशी माहिती दिल्ली कॅपिटल्स संघाकडून देण्यात आली.
दिल्ली कॅपिटल्समधील श्रेयस अय्यरचा प्रवास
श्रेयसने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्या वर्षी त्यांची कामगिरी खूपच वाईट झाली. त्यानंतर २०१९ स्पर्धेत त्यांनी प्ले-ऑफ्समध्ये स्थान पटकावले. २०१२ नंतर पहिल्यांदा त्यांनी ही किमया साधली होती. २०२० मध्ये दिल्लीने स्पर्धेत अंतिम फेरीत गाठली. पण मुंबईने दिल्लीला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. २०२१ ची IPL स्पर्धा सुरू होण्याआधी श्रेयस अय्यरला खांद्याला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यावेळी ऋषभ पंतला संघाचे नेतृत्व देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.