IPL 2021:उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून; दसऱ्या दिवशी फायनल?

जैवसुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली.
IPL 2021
IPL 2021File Photo
Updated on

IPL 2021 Resume In UAE : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने UAE च्या मैदानात रंगणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उर्वरित स्पर्धा सप्टेंबरपासून सुरुवात होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. आता तारखांच्या संदर्भात चर्चेला उधाण आले आहे. 19 उर्वरित स्पर्धेला सुरुवात होणार असून दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला फायनल सामना खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयकडून मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

29 सामन्यानंतर 4 मे रोजी भारतात रंगलेली स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. जैवसुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता स्पर्धेतील उर्वरित सामने युएईत घेण्यात येणार आहेत. 2014 मध्ये आयपील स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात रंगले होते. त्यानंतर 2020 च्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईत झाली होती. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा युएईच्या मैदानात आयपीएलचे वारे वाहताना दिसणार आहे.

IPL 2021
माफीनाम्यानंतरही क्रिकेट करियरला ब्रेक! नेमकं काय आहे प्रकरण

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय उर्वरित सामने 25 दिवसांत संपवण्याचा प्लॅन आखत आहे. युएई क्रिकेट बोर्डासोबत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालीये. बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीपूर्वीच युएई क्रिकेट बोर्डाने उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याची परवानगी दिली होती. मागील आठवड्यात त्याच्यावर अंतिम निर्णय झाला. 19 सप्टेंबरापासून उर्वरित सामन्याला सुरुवात होणार असून शारजहा, दुबई आणि अबुधाबीच्या मैदानात सामने खेळवण्यात येणार आहेत, असे संकेतही त्यांनी दिले.

IPL 2021
सेरेनाचा खेळ खल्लास! 21 वर्षांच्या पोरीनं रडवलं!

उर्वरित सामन्यात परदेशी खेळाडूंच्या सहभागासंदर्भातही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की. वेगवेगळ्या क्रिकेट बोर्डांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला आम्हाला चांगला प्रतिसादही मिळत असून बऱ्यापैकी परदेशी खेळाडून उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध होतील. जे खेळाडू उपलब्ध होणार नाहीत त्यांच्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते नंतर ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्स 12 पॉइंटसह अव्वल

स्पर्धा स्थगित झाली त्यावेळी रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 पैकी 6 सामन्यांतील विजयासह 12 गुण मिळवून टॉपला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.