CSK अन् धोनी IPLसाठी सज्ज पण पुढ्यात उभी राहिलीय वेगळीच अडचण

CSK अन् धोनी IPLसाठी सज्ज पण पुढ्यात उभी राहिलीय वेगळीच अडचण CSK चे CEO कासी विश्वनाथ यांनी दिला या समस्येची माहिती IPL 2021 MS Dhoni led CSK facing problems as they have not yet got permission from BCCI to land in UAE vjb 91
MS-Dhoni-led-CSK
MS-Dhoni-led-CSK
Updated on

CSK चे CEO कासी विश्वनाथ यांनी दिला या समस्येची माहिती

IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या CSK संघाने IPL2021च्या उर्वरित हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. IPL 2020च्या हंगामात धोनीच्या CSKला फारसे यश मिळू शकले नाही. IPL 2021च्या स्पर्धेत चेन्नईने चांगली कामगिरी केली होती. पण कोरोनाच्या (Corona) फटक्यामुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली. आता १९ सप्टेंबरपासून IPL 2021चा उर्वरित हंगाम (Remaining Matches) खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी धोनी दोन दिवसांपूर्वी चेन्नईत दाखल झाला. त्याची झलक पाहण्यासाठी चेन्नईकरांनी गर्दी केली होती. CSKचा संघ युएईला रवाना होण्यासाठी आला खरा पण त्यांच्या पुढ्यात एक वेगळीच अडचण उभी ठाकली आहे.

MS-Dhoni-led-CSK
IPL 2021: CSKच्या धोनीची झलक पाहण्यासाठी चेन्नईकरांची गर्दी

CSKचा संघ बुधवारी युएईला जाणार असं नियोजन ठरलं होतं. परंतु, युएईमध्ये उतरण्यासाठी अद्याप CSKच्या खेळाडूंना परवानगीच देण्यात आली नसल्याचे CSKचे CEO कासी विश्वनाथ यांनी सांगितले. "CSKचा संघ युएईमध्ये घेऊन जाण्याची परवानगी अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आम्ही सातत्याने BCCI शी संपर्क साधतो आहोत. BCCI देखील युएईतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. आम्हाला बुधवारी या संबंधीची परवानगी मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप आम्हाला परवानगी देण्यात आलेली नाही. कदाचित आज (गुरूवार) आम्हाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे", अशी माहिती विश्वनाथ यांनी दिली.

MI VS CSK
MI VS CSKFile Photo
MS-Dhoni-led-CSK
शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

IPL 2020 मध्ये धोनीच्या संघाने अतिशय वाईट कामगिरी केली. धोनीला वैयक्तिक स्तरावरही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर धोनी IPL मधूनही निवृत्त होणार का? अशी चर्चा रंगली होती. पण धोनी IPL 2021च्या हंगामासाठी नव्या उमेदीने उतरला. सात सामन्यांमध्ये पाच सामने जिंकत धोनीच्या संघाने १० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पण कोरोनामुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली. आता १९ सप्टेंबरपासून उर्वरित स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात नसून युएईमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे युएईला रवाना होण्यासाठी CSKचा संघ आणि धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. आता BCCIने परवानी दिल्यावर हा संघ पुढे रवाना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.