इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा वर्ल्ड कपची रंगीत तालीमच असेल. या स्पर्धेत टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान न मिळालेल्या खेळाडूंनाही अखेरची संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने 8 सप्टेंबरला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या (Indian team) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि फिरकीपटू यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) यांना डच्चू देण्यात आला. पण त्यांच्यासाठी वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी दरवाजे पुन्हा खुले होऊ शकतात.
वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी संघात बदल करण्याची प्रत्येक संघाला संधी आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत हे बदल शक्य आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआय विचार करु शकते. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरी करुन आयत्यावेळी थेट संघात स्थान मिळवण्याची शिखर धवन, युजवेंद्र चहल यांच्यासह अन्य खेळाडूंना संधी प्राप्त होईल. ज्या मैदानात आयपीएल स्पर्धा रंगणार आहे त्याच ठिकाणी वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर काही खेळाडूंचा पुन्हा वर्ल्ड कपसाठी विचार केला जा
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याला संघात संधी मिळालेली नाही. युवा ईशान किशनला संधी दिली गेली. संघात आधीच केएल राहुल आणि रिषभ पंत हे यष्टिरक्षक फलंदाज असतानाही ईशान किशनच्या निवडीवरुन प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. अक्षर पटेलच्या निवडीवरुन देखील अश्चर्यव्यक्त होत आहे. दीपक चाहरने श्रीलंका विरुध्दच्या सामन्यासह चेन्नई सुपर किंग्स संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. तरी देखील त्याच्या जागी अक्षर पटेलची निवड केल्याने अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
युएईसह आणि आयसीसी स्पर्धेत शिखर धवनची धमाकेदार कामगिरी
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात रंगली होती. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शिखर धवनने आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवली होती. 17 सामन्यात 618 धावा कुटल्या होत्या. यात त्याने 2 शतकासह 4 अर्धशतक झळकावली होती. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही 3 अर्धशतकाच्या मदतीने धवनने 8 सामन्यात 380 धावा केल्या आहेत. आयसीसीच्या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम हा शिखर धवनच्या नावे आहे. त्यामुळेच युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत त्याने धमाका करुन दाखवला तर त्याची संघात वर्णी लागू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.