'मी पुन्हा येईन...'; IPL सुरू होण्याआधी स्टार क्रिकेटपटूची पोस्ट

'मी परत येईन...'; IPL सुरू होण्याआधी स्टार क्रिकेटपटूची पोस्ट IPL 2021 चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे IPL 2021 2nd Leg David Warner land in UAE to play IPL 2021 SRH captain drops big hint with Instagram post vjb 91
ipl
iplFile Photo
Updated on

IPL 2021 चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2021 चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबई विरूद्ध चेन्नई या सामन्याने ही स्पर्धा सुरू होईल. कोरोनाचा धोका असतानाही IPL 2021 चे आयोजन भारतात करण्यात आले. जवळपास अर्धी स्पर्धा झाली आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका IPL ला बसला. या अर्ध्या हंगामात चर्चा झाली ती एका फोटोची... डेव्हिड वॉर्नरचा एक फोटो त्यावेळी खूप व्हायरल झाला. त्यानंतर वॉर्नर संघातून खेळणार की नाही यावर चर्चा रंगली होती. त्याचे उत्तर थेट वॉर्नरनेच दिले.

ipl
IND vs ENG: 'टीम इंडिया'ला मोठा धक्का; खेळाडू दुखापतग्रस्त
वॉर्नरचा व्हायरल झालेला फोटो
वॉर्नरचा व्हायरल झालेला फोटोE-Sakal

IPL 2021 पहिल्या टप्प्यात हैदराबादच्या संघाला चांगली कामगिरी करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्यासोबतच त्याला संघातूनही वगळण्यात आले. त्यावेळी सीमारेषेबाहेर डोकं गुडघ्याला टेकवून बसलेला वॉर्नर सगळ्यांना आठवत असेलच. त्यानंतर वॉर्नर दुसऱ्या टप्प्यासाठी येणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू होती. त्याचे उत्तर वॉर्नरने इन्स्टाग्राम पोस्टवरून दिले. वॉर्नरने आपला हैदराबादच्या जर्सीमधील फोटो पोस्ट केला आणि मी परत येईन असा मेसेज दिला.

ipl
IND vs ENG: विराट कोहली, जो रूट दोघांनाही बसला दंड; कारण...

दरम्यान, IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याला सप्टेंबरमध्ये सुरूवात होणार असली तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. काही खेळाडू नुकतेच युएईमध्ये दाखल झाले आहेत. तर काही खेळाडू आपापल्या संघासोबत वेगवेगळ्या क्रिकेट मालिका खेळून लवकरच युएईमध्ये दाखल होणार आहेत. सध्या IPL 2021च्या पहिल्या टप्प्यात अंदाजे सर्व संघांचे किमान ७ सामने खेळून झाले आहेत. त्यात दिल्ली अव्वल स्थानी तर चेन्नई दुसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.