IPL Final : सांगता समारंभावर असणार धोनीच्या झारखंडची छाप

आयपीएल १५ वा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. अखेरचा सामना २९ मे ला अहमदाबादला खेळवण्यात येणार आहे.
IPL Final : सांगता समारंभावर असणार धोनीच्या झारखंडची छाप
esakal
Updated on

आयपीएल १५ वा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. अखेरचा सामना २९ मे ला अहमदाबादला खेळवण्यात येणार आहे. अशातच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फायनल ही अन्य सामन्यांसारखी रात्री ७.३० वाजता सुरु होणार नाही. तसेच सामन्यापूर्वी पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. आणि विशेष म्हणजे छऊ नृत्य सोहळा पाहायला मिळणार आहे.

आयपीएलची फायनल यावेळी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात बॉलीवूडचे कलाकार सहभागी होणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी ६.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सोहळा जवळपास ५० मिनिटे चालणार आहे.

गेली काही वर्षे आयपीएलचा समारोप सोहळा करण्यात आला नव्हता. या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळाही करण्यात आला नाही.

IPL Final : सांगता समारंभावर असणार धोनीच्या झारखंडची छाप
चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी! - VIDEO

छऊ नृत्य सोहळा

आयपीएलच्या सांगता सोहळ्यात छऊ न्यृत्य पाहायला मिळणार आहे. यासाठी झारखंडहून नृत्याचा गट अहमदाबादकडे रवाना झाला आहे. सुदूरवर्ती गाव चोगामध्ये राहणारे प्रभात कुमार महतो १० सदस्यींसोबत परफॉर्म करतील.

बीसीसीआय या टीमचा येण्या जाण्याचा खर्च करणार आहे. हा गट मानभूम छऊ पेश करेगी. मिळालेल्या माहितीनुसार, सरायकेला छऊ ही १२०० वर्षे पौराणिक कला आहे.

छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.

प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.

IPL Final : सांगता समारंभावर असणार धोनीच्या झारखंडची छाप
मिलरच्या ट्वीटवर राजस्थानचे उत्तर," दुश्मन ना करे दोस्त ने ..."

८ वाजता सुरु होणार सामना

सोहळ्यानंतर १० मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार आहे. या ब्रेकनंतर ७.३० मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे. टॉसनंतर पुन्हा एकदा अर्ध्या तासाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना ७.३० ऐवजी आता रात्री ८.०० वाजता सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.