शाहरुख-जुहीचा मास्ट्रर स्ट्रोक; कॅप्टन्सीसाठी मुंबईकराला हेरलं

 IPL 2022
IPL 2022Sakal
Updated on

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction 2022) दिल्ली कॅपिटल्सने Delhi Capitals (DC) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रिलीज केले. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना त्याने विशेष छाप सोडली होती. पण तो दुखापतीमुळे गत आयपीएल हंगामातील पहिल्या टप्प्यातील स्पर्धेला मुकला. याकाळात दिल्लीचे तख्त बदलले. रिषभ पंत (Rishabh Pant) दिल्लीचा नवा सेनापती झाला. अय्यर संघात परतल्यानंतरही दिल्लीच्या संघाने पंतवर विश्वास कायम ठेवला. आगामी हंगामापूर्वी दिल्लीने अय्यरला रिटेनही केले नाही.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी श्रेयस अय्यर नव्या फ्रेंचायझींची पहिली पंसती असेल, अशी चर्चा रंगली होती. विराट कोहलीनं (Virat Kohli) बंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स (RCB) संघाच नेतृत्व सोडल्यानंतर या संघाच्या कर्णधारपदी अय्यर दिसू शकतो, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगली होती. पण आता नवी माहिती समोर येत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ (Kolkata Knight Riders, KKR) श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबादीर देण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे. फ्रेंचायझीनं अधिकृतरित्या यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

 IPL 2022
'कोर्टातील' विजय अधिक रोमांचक; जोकोविचच्या आईची प्रतिक्रिया

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 2020 च्या हंगामात फायनलपर्यंत मजल मारली होती. संघाच्या कामगिरीशिवाय त्याची वैयक्तिक कामगिरीही लक्षवेधी ठरली होती. नेतृत्व करताना त्याने 35.00 च्या सरासरीनं 519 धावा केल्या. अय्यरनं भारतीय संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने 2 कसोटी, 22 वनडे आणि 32 टी-20 सामन्यातील कामगिरीनंही सर्वांची मन जिंकली आहेत.

 IPL 2022
पुजारा-अजिंक्यला अजूनही किंमत; कोहली दाखवणार खेळवण्याची हिंमत

कोलकाता नाईट रायडर्स त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने अन अपेक्षितपणे फायनल गाठली होती. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने दिमाखदार कामगिरी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()