प्रितीला अलविदा करुन राहुल झाला मालामाल!

kl rahul highest paid player in history of ipl
kl rahul highest paid player in history of ipl Sakal
Updated on

भारतीय संघाचा स्टार फलंदाज लोकेश राहुल (KL Rahul) सध्या चांगलाच नशिबवान ठरतोय. प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जला अलविदा केल्यानंतर लखनऊनं त्याला मालामाल केलं आहे. आयपीएलच्या रिंगणात नव्यानं उतरणाऱ्या लखनऊ संघानं केएल राहुलसाठी 17 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार होण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. त्याने विराट कोहलीची बरोबरी केलीये. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांना त्याने मागे टाकलं आहे.

एक वेळ अशी होती की टीम इंडियात (Team India) लोकेश राहुलची (KL Rahul) जागा पक्की नव्हती. पण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी आली. आयपीएलमध्येही (IPL 2022) त्याची चांगलीच चलती आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात तो लखनऊ संघाचे (Lucknow IPL Team) नेतृत्व करताना दिसणार आहे.

2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विराट कोहलीला 17 कोची रुपये इतकी भली मोठी रक्कम मोजून कॅप्टन म्हणून रिटेन केले होते. आता लखनऊने इतकीच रक्कम मोजून राहुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिलीये. त्याच्याशिवाय संजीव गोयंका यांच्या फ्रेंचायझीने ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर मार्कस स्टॉयनिस (9.2 कोटी) आणि लेग स्पिनर रवि बिश्नोईसाठी (4 कोटी) मोजले आहेत.

kl rahul highest paid player in history of ipl
द्रविडसंदर्भात अख्तरचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीसाठी 12 कोटी मोजले होते. त्याच्यापेक्षा अधिक रक्कम चेन्नईने रविंद्र जाडेसाठी मोजली. जाडेजाला मेगा लिलावापूर्वी 16 कोटीत रिटेन करण्यात आले. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मासाठी 16 कोटी मोजले आहेत. अहमदाबादने हार्दिक पंड्या आणि राशिद खानला प्रत्येकी 15-15 कोटी रुपये दिले आहेत.

kl rahul highest paid player in history of ipl
ICC Awards : आपल्या कॅप्टनला धोबीपछाड देत रिझवान ठरला किंग

17 भारतीय खेळाडूंची बेस प्राइज 2 कोटी

आयपीएल 2022 मेगा लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत. यातील 17 भारतीय खेळाडूंची मूळ किंमत ही 2 कोटी रुपये आहे. यात रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, अंबाती रायडू, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर या टीम इंडियातील खेळाडूंचा समावेश आहे.

कोणत्या देशाचे किती खेळाडूंनी केली नाव नोंदणी?

यंदाच्या हंगामासाठी भुतानचा एक खेळाडूनंही नाव नोंदणी केली आहे. त्याच्याशिवाय अमेरिकेतील 14 खेळाडूंच्या नावाचाही समावेश आहे. परदेशातील ऑस्ट्रेलियन खेळाडू सर्वाधिक उत्सुकता दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण 59 खेळाडू मेगा लिलावात असतील. दक्षिण आफ्रिकेचे 48 खेळाडू लिलावात सहभागी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.