IPL 2022: ‘दिल्ली’वरचे कोरोना संकट दूर

मिशेल मार्शची चाचणी निगेटिव्ह, बुधवारचा पुण्यातील सामना होणार
ipl 2022 mitchell marsh tests covid negative match will be played in Pune on Wednesday
ipl 2022 mitchell marsh tests covid negative match will be played in Pune on Wednesday sakal
Updated on

मुंबई : दिल्ली संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्श याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आणि संपूर्ण संघाने सुटकेचा निश्वास टाकला. कोरोनाचे संकट दूर झाले, त्यामुळे दिल्लीचा पंजाब किंग्ज संघाविरुद्ध बुधवारी पुण्यात होणाऱ्या सामन्याचा मार्ग मोकळा झाला.आरोग्य सुरक्षिततेच्या कटेकोट उपाययोजना असताना दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहात यांना शुक्रवारी सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांनी धास्ती घेतली होती. त्यांचे लगेचच अलगीकरण करण्यात आले होते. आता त्यांचीही आरटीपीसीआर निगेटिव्ह आली आहे.

आरटीपीसीआरचा निकाल अंतिम समजला जातो. मिशेल मार्शसह दिल्ली संघातील सर्व खेळाडूंची ही चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल आज आला आणि सर्व खेळाडू निगेटिव्ह आहेत, त्यामुळे दिल्लीचा पंजाबविरुद्धचा सामना नियोजनानुसार होईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. फरहाद यांची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली आणि ते फिजिओ असल्यामुळे मिशेल मार्शने त्यांच्याकडे उपचार घेतले होते. परिणामी मिशेल मार्शलाही लागण झाल्याचे सांगण्यात येत होते. मिशेल मार्श शुक्रवारी बंगळूरविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघातून खेळला होता. त्यामुळे संपूर्ण संघाचे विलगीकरण करण्यात आले होते.

शनिवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्लीचा बंगळूरविरुद्ध सामना झाला, त्याच्या आदल्या दिवशी फिजिओ फरहात यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांचे लगेचच विलगीकरण करण्यात आले होते.

असा आहे नियम

यंदाच्या आयपीएलसाठी बीसीसीआयने कोरोनासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्यानुसार संघातील ज्या सदस्याला कोरोनाची लागण होईल, त्याला सात दिवसाचे अलगीकरण करावे लागेल आणि पुढच्या चाचणीत तो निगेटिव्ह आला तरच त्याला पुन्हा जैवसुरक्षा वातावरणात स्थान मिळेल. संघात एकापेक्षा अधिक बाधित झाले, तर १२ खेळाडू कोरोनामुक्त असतील तरच तो संघ मैदानात उतरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()