टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजनं कोहलीसंदर्भातील एक खास आणि अविस्मरणीय गोष्ट शेअर केलीये. सिराजने एकदा किंग कोहलीसह RCB च्या संघातील सहकाऱ्यांना घरी बोलावले होते. पहिल्यांदा विराट हो म्हणाला पण नंतर त्याने पाठीचं दुखणं सांगत येणं शक्य नाही, असे म्हटले. विराट कोहलीच्या नकारामुळे सिराजसह त्याच्या कुटुंबियातील सदस्यांचा हिरमोड झाला होता. पण अचानक कोहलीने सर्वांनाच सरप्राइज दिले. विराट अचानक घरी आल्यावर सिराज थेट त्याच्या गळ्यात पडला. ही गोष्ट आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव होता, असेही त्याने सांगितले. (IPL 2022 Mohammed Siraj about Virat Kohlis Surprise)
मोहम्मद सिराज Mohomed Siraj याने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर केल्या. यात तो म्हणाला की, पुण्यात मॅच खेळत असतानाच मी आरसीबीमधील सहकाऱ्यांना घरी जेवणासाठी बोलावले होते. हैदराबादमध्ये पोहचल्यानंतर मी हॉटेलमधून थेट घरी गेलो. ज्यावेळी विराट कोहलीला (Virat Kohli) कॉल केला त्यावेळी थोडी निराशा झाली. मियां पीठ में अकड़न है.. असे कोहलीने सांगितले. ठिक है भैय्या असं म्हणण्यापेक्षा वेगळा पर्याय माझ्याकडे नव्हता. मी विश्रांती घ्या असे सांगून कॉल ठेवला. इतर खेळाडू आले त्यावेळी विराट कोहलीही कारमधून उतरल्याचे पाहून आनंद झाला, असे तो म्हाला. पीपी भाई (पार्थिव पटेल), चहल भाई आणि इतर खेळाडू घरी आले. पण मी भैय्या (विराट) च्या दिशेने पळत सुटलो आणि त्याची गळा भेट घेतली. कारण येणार नाही असे सांगून कोहली घरी येणं हे माझ्यासाठी मोठं सरप्राईज होते, असे सिराजने सांगितले.
आयपीएलमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली, हे सांगायलाही तो विसरला नाही. माझे आयुष्य हे संघर्षमयी होते. वडील रिक्षा चालवायचे. माझ्याकडे प्लॅटिना होती. वडील पेट्रोलसाठी 60 रुपये द्यायचे. उप्पल स्टेडियमवर जाण्यासाठी मला खूप कसरत करायला लागायची. पण जेव्हा आयपीएलमध्ये वर्णी लागली तेव्हा सर्व चित्रच बदलले. वडिलांनी रिक्षा चालवणं बंद केले. आईनेही दुसऱ्यांच्या घरी काम करणे सोडून दिले, ही कहाणी त्याने शेअर केली. आयपीएल संघाकडून खेळल्यानंतरच भाड्याच्या घरातून सुटका झाली. स्वत:चे घर खरेदी करु शकलो, असे या स्टार गोलंदाजाने सांगितले.
सिराज आयपीएल 2022 मध्ये आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंमधील एक आहे. विराट कोहली आणि ग्रेन मॅक्सवेलसह संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारतीय संघाला मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटाही उचलला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.