IPL 2023 Sunriser Hyderabad Captain : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएलचा 16वा हंगामाला एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राहिला आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे जिथे आयपीएलच्या सर्व संघांचे कर्णधार निश्चित मानले जातात, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
आगामी हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करामची आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादने ट्विट करून आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
2016 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 16च्या मिनी-लिलावापूर्वी नियमित कर्णधार केन विल्यमसनला सोडले. त्यानंतर मयंक अग्रवाल, एडन मार्कराम आणि भुवनेश्वर कुमार कर्णधारपदाचे दावेदार म्हणून उदयास आले. या सर्वांना डावललं सनरायझर्स हैदराबादने मार्करामवर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे संघाची जबाबदारी सोपवली.
मार्करामने आयपीएलच्या गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडूनच खेळत होता. मार्करामने आयपीएल 2022 मध्ये 40.54 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने एकूण 381 धावा केल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.