IPL 2023 Auction Mumbai Indians Sikandar Raza : येत्या 23 डिसेंबरला आयपीएल 2023 चे मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. या ऑक्शनपूर्वी सर्व संघ आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करतील. गेल्या मेगा ऑक्शनमध्ये सगळ्याच संघात मोठे बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाचा देखील संपूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला आहे.
दरम्यान, यंदाच्या मिनी लिलावात मुंबईने एका चांगल्या फिरकीपटूवर दाव लावावा असा सल्ला भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने दिला आहे. अनिल कुंबळेने यासाठी काही नावे देखील सुचवली आहे. यात प्रामुख्यांने झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाच्या नावाला प्राधान्य द्यावे असे अनिल कुंबळेने सुचवले आहे.
अनिल कुंबळे सिकंदर रझाबाबत बोलताना म्हणाला की, 'मी सिकंदर रझावर जास्त भर देईन. कारण तो ऑफ स्पिनबरोबरच मधल्या फळीत फलंदाजीचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याची फिरकी गोलंदाजी फलंदाजांना गोंधळात टाकणारी असते. याचबरोबर तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे.'
अनिल कुंबळेने मुंबईला सिकंदर रझा व्यतिरिक्त आदिल राशीद आणि अॅडम झाम्पाचा देखील विचार करण्याचा सल्ला दिला. कुंबळे म्हणाला की, 'मुंबईकडे चांगला फिरकी गोलंदाज नाहीये. गेल्या वर्षी कार्तिकेयने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली होती. जर मुंबई इंडियन्स भारतातील अनुभवी फिरकीपटूचा विचार करत असतील तर त्यांना पुन्हा अमित मिश्रा आणि पियुष चावला यांच्याकडे जावे लागले. मला नाही वाटत की मुंबई हा निर्णय घेईल. त्याच्याऐवजी मुंबई विदेश फिरकीपटूंवर आपला दाव लावू शकतात. यामध्ये ते अदिल राशीद, तबरेझ शाम्सी, अॅडम झाम्पा यांचा विचार करू शकतात.
मुंबई इंडियन्स गेल्या दोन हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली आहे. गेल्या 2022 च्या हंगामात तर मुंबई गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर राहिली होती. त्यांनी 2022 मधील मेगा लिलावात आपल्या संघातील 13 खेळाडूंना रिलीज केले होते. आता 2023 च्या मिनी लिलावात त्यांच्या पर्समध्ये 20.55 कोटी रूपय आहेत. त्यामध्ये त्यांना संघातील 9 जागा भरायच्या आहेत. त्यातील निदान 3 खेळाडू हे विदेशी असले पाहिजेत.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.