IPL 2023 Auction Rehan Ahmed : आयपीएल 2023 चा लिलाव उद्या (दि. 23) कोची येथे पार पडणार आहे. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा समावेश असेल. यात इंग्लंडचा युवा फिरकीपटू रेहान अहमदचे देखील नाव समाविष्ट आहे. रेहानने नुकताच पाकिस्तानविरूद्ध आपला कसोटी डेब्यू केला. अवघ्या 18 वर्षाच्या रेहान अहमदने तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला आपल्या फिरकीवर नाचवले. आता तो कोची येथे होणाऱ्या आयपीएल लिलावात देखील धुमाकूळ घालू शकतो. हे आम्ही नाही तर खुद्द ब्रँडन मॅक्युलम म्हणत आहे.
आयपीएलच्या मिनी लिलावात 405 खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या 10 संघांकडे 87 जागा रिकाम्या आहेत. अनेक फ्रंचायजी या चांगल्या फिरकीपटूच्या शोधात आहेत. अशावेळी इंग्लंडचा 18 वर्षाचा रेहान त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच कसोटीत पाकिस्तानचे 7 फलंदाज बाद केले होते. त्याने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात रेहानने कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, साऊद शकील आगा सलमान आणि मोहम्मद वसीम यांना बाद केले होते.
इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम रेहानबद्दल म्हणाले की, रेहानला पाकिस्तानविरूद्धच्या कामगिरीचा फायदा होईल त्याला आयपीएल लिलावात मोठी बोली लागू शकते. जर तो सोल्ड होतो तर खूप छान होईल. तो संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. युएई आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमध्ये देखील तो करारबद्ध झाला आहे. ही स्पर्धा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खेळली जाईल.
रेहानने आयपीएल लिलावासाठी आपली बेस प्राईस ही 40 लाख इतकी ठेवली आहे. जर नशिबाने साथ दिली तर त्याच्यावर मोठी बोली देखील लागू शकते.
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.