IPL 2023 Auction: IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! कोणाची आहे मक्तेदारी भारतीय की परदेशी?

IPL 2023 Auction
IPL 2023 Auction
Updated on

IPL 2023 Mini Auction : इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून या लीगची कीर्ती सतत वाढत आहे. लीगमधील संघ आपल्यासोबत चांगले खेळाडू घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. जेव्हा लिलाव होतो तेव्हा अनेक वेळा अनेक संघ एकाच खेळाडूसाठी बोली लावू लागतात आणि अशा परिस्थितीत त्या खेळाडूची किंमत खूप वाढते. लीगच्या इतिहासात असे अनेक खेळाडू घडले आहेत ज्यांना प्रचंड पैसा मिळाला आहे. या लीगमधील पाच सर्वात महागडे खेळाडू आहेत. कोणाची आहे मक्तेदारी भारतीय की परदेशी पाहू...

IPL 2023 Auction
World Saree Day 2022: भारतीय साडी एकदम भारी! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल

2021 च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसवर मोठा सट्टा खेळला होता. राजस्थानने दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यामुळे तो लीग इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र मॉरिस त्याच्यावर लादलेल्या किमतीनुसार कामगिरी करू शकला नाही. पुढच्याच हंगामात त्याला राजस्थानने सोडले.

IPL 2023 Auction
IPL Impact Player : भारतीय इम्पॅक्ट प्लेअरच खेळवता येणार; बीसीसीआयने केले स्पष्ट

दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2015 च्या हंगामासाठी भारतीय खेळाडू युवराज सिंगला 16 कोटी रुपयांना विकत घेतले. युवराज 2021 पर्यंत लीगमधील सर्वात महागडा खेळाडू राहिला होता. आता तो लीग इतिहासातील दुसरा सर्वात महागडा आणि महागडा भारतीय खेळाडू आहे.

2020 च्या मोसमासाठी कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्या मोसमात कमिन्सची कामगिरी फारशी नाही, पण तरीही कोलकात्याने त्याला आपल्यासोबत ठेवले. कमिन्स 2021 च्या हंगामानंतर सोडण्यात आले आणि नंतर अर्ध्या किमतीत पुन्हा विकत घेतले.

IPL 2023 Auction
Ramiz Raja: वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?

2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावात संघांनी भरपूर पैसे खर्च झाले. मुंबई इंडियन्स देखील त्यापैकी एक आहे. मुंबईने अतिशय हुशारीने आपले पैसे खर्च केले आणि इशान किशनला विकत घेण्यासाठी 15.25 कोटी रुपयांची बोली लावली. किशन हा या लीगमधील दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे.

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने 2017 मध्ये प्रथमच आयपीएल लिलावात भाग घेतला होता. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने पहिल्या सत्रात 14.5 कोटी रुपयांची बोली लावून स्टोक्सला सर्वात महागडा खेळाडू बनवले. त्यावेळी स्टोक्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.